स्कूल बॅगमध्ये मिळाले सापाचे विष, किंमत १०० कोटी

पश्चिम बंगालच्या बेलकोबामध्ये १०० कोटी रुपयांच्या किंमतीचे सापाचे विष जप्त केले आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. 

Updated: Jun 28, 2015, 03:00 PM IST
स्कूल बॅगमध्ये मिळाले सापाचे विष, किंमत १०० कोटी  title=

बेलकोबा : पश्चिम बंगालच्या बेलकोबामध्ये १०० कोटी रुपयांच्या किंमतीचे सापाचे विष जप्त केले आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. 

बैकुंठपूर वन विभागाचे रेंजर संजय दत्त यांनी सांगितले की, पोलिस कर्मचाऱ्यांनी सहा लोकांना अटक केली आहे. 

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन मोटरसायकलवर जात असलेल्या व्यक्तींकडून विष जप्त केले आहे. हे विष घेऊन ते भुटानला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हे विष एका स्कूल बॅगमधील डब्यात ठेवले होते. हे व्यक्ती घेऊन जात आहे. 

वैज्ञानिक सापाचे विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या औषधांमध्ये विषाचा उपयोग करतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.