डॉ.कलाम यांनी सांगितलेल्या १० प्रेरणादायी गोष्टी

माजी राष्ट्रपती डॉ. अब्दूल कलाम यांचं सोमवारी शिलाँगमध्ये निधन झालं, डॉ. कलाम हे सामान्य माणसांचे राष्ट्रपती म्हणून कलाम यांची ओळख होती.

Updated: Jul 28, 2015, 10:54 AM IST
डॉ.कलाम यांनी सांगितलेल्या १० प्रेरणादायी गोष्टी title=

मुंबई : माजी राष्ट्रपती डॉ. अब्दूल कलाम यांचं सोमवारी शिलाँगमध्ये निधन झालं, सामान्य माणसांचे राष्ट्रपती म्हणून कलाम यांची ओळख आहे.

विद्यार्थ्यांमध्ये कलाम अत्यंत लोकप्रिय आणि अनेकांना प्रेरणादायी ठरले. ते नेहमी विद्यार्थ्यांशी बोलत आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतं.

डॉ.कलाम यांनी सांगितलेल्या १० प्रेरणादायी गोष्टी

तुमचं स्वप्न सत्यात उतरवता येईल, यासाठी सर्वात आधी स्वप्न पाहायला हवं.

श्रेष्ठता तुमच्या कार्याने तयार होते, ती अपघाताने येत नाही.

जीवन हा कठीण खेळ आहे, तुम्हाला मानव म्हणून जो जगण्याचा जन्मजात अधिकार मिळाला आहे, तो कायम ठेऊन तो तुम्ही जिंकू शकतात.

जीवनात अनेक अडचणी येत असतात, कारण यशाचा आनंद घेण्यासाठी अडचणी सर्वात महत्वाच्या ठरतात.

आम्हाला तेव्हाच आठवलं जाईल, जेव्हा आपली युवा पिढी एक समृद्ध आणि सुरक्षित भारत बनवेल. या समृद्धी भारताचा स्त्रोत आपण दिलेली आर्थिक समृद्धी आणि सभ्यता असेल.

जे लोक मनापासून काम करत नाहीत, त्यांना जे यश मिळतं ते हलकफुलकं आणि अर्धवट असतं, त्यामुळे द्वेष पसरतो.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये समानता, उद्योजक, नेतृत्व गुणाची भावना विकसित करायला हवी, असे शिक्षक मुलांसाठी आदर्श ठरतील.

आकाशाकडे पाहा, तुम्ही एकटे नाहीत, तो संपूर्ण ब्रह्मांड तुमचा मित्र आहे, आणि तो त्याच लोकांना सर्वोत्तम देतो, जे स्वप्न पाहतात, मेहनत करतात.

जर कोणत्या देशाला भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल, तर माझं मत आहे, यासाठी तीन लोकांची महत्वाची भूमिका आहे, हे तीन लोक आहेत, आई, वडील आणि शिक्षक.

माझा संदेश !, विशेष म्हणजे युवकांसाठी, युवकांनी वेगळ्या पद्धतीने विचार करण्याचं धाडस दाखवावं, नवनवीन संधोधन करण्याचं धाडस दाखवावं. अनोळखी वाटा निवडा, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शोधा, अडचणींवर विजय मिळवत यश मिळवा, ये अतिशय महान गुण आहेत, यामुळे तुम्ही यशाकडे वाटचाल करू शकतात, युवकांसाठी माझा हाच संदेश आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.