जवानांनी घेतला बदला, १० नक्षलवाद्यांना केलं ठार

सीआरपीएफने नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. सुकमा हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले होते. सीआरपीएफने १० नक्षववाद्यांना ठार केलं आहे. जवानांनी केलेल्या फायरिंगमध्ये ५ नक्षलवादी जखमी देखील झाले आहेत.

Updated: Apr 27, 2017, 04:19 PM IST
जवानांनी घेतला बदला, १० नक्षलवाद्यांना केलं ठार title=

नवी दिल्ली : सीआरपीएफने नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. सुकमा हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले होते. सीआरपीएफने १० नक्षववाद्यांना ठार केलं आहे. जवानांनी केलेल्या फायरिंगमध्ये ५ नक्षलवादी जखमी देखील झाले आहेत.

२५ जवान शहीद झाल्यानंतर बदला घेण्याची मागणी देशभरातून होत होती. कारवाई करण्यासाठी चर्चा देखील सुरु होती. सरकारकडून सीआरपीएफला अॅक्शन घेण्यासाठी देखील परवानगी मिळाली होती. त्यानुसार जवानांनी नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

सुकमामध्ये २४ एप्रिलला नक्षलवाद्यांनी जवानांवर घात करुन हल्ला केला. ज्यामध्ये २५ जवान शहीद झाले होते. देशभरातूव या विरोधात संताप व्यक्त केला जात होता. सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे नक्षलवाद्यांवर देखील कारवाईची गणी सर्व स्तरातून होत होती.

नक्षलवाद्यांची कंबर मोडण्यासाठी देशातील सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर विभाग कामाला लागल्या आहेत. जंगलामध्ये लपून बसलेल्या नक्षलवाद्यांना ठार करण्यासाठी रननीती आखली जात आहे. तंत्रज्ञानाचा देखील यासाठी वापर केला जाणार आहे. आंध्र प्रदेश, उडिशा आणि झारखंडमधील नक्षलवाद्याबाबतची माहिती देखील मागवण्यात आली आहे. नक्षलवाद्यांशी सामना करण्यासाठी आता रणनिती आणखी जात आहे.