ही व्हिडिओ क्लीप पाहू नका, अन्यथा डोक्याला हात लावण्याची वेळ येईल?

भारतातल्या 10 बँकांच्या खात्यांची गोपनीय माहिती हॅक केल्याची सूत्रांची माहिती आहे. काही खात्यांमधून पैसेही गायब झालेले आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या एमडींचा या वृत्ताला दुजोरा मिळालाय.

Updated: Sep 9, 2016, 08:10 AM IST
ही व्हिडिओ क्लीप पाहू नका, अन्यथा डोक्याला हात लावण्याची वेळ येईल? title=

नवी दिल्ली : हॅकर्स मोबाईलवरून व्हिडिओ क्लीप पाठवत असून यात मलेशिया एअरलाइन्चेचं विमान समुद्रात पडल्याची दृश्य आहेत. मात्र ही व्हिड़िओ क्लिप नसून हा व्हायरस आहे. त्यामुळे हा व्हिडिओ उघडणेच धोक्याचं असून आपल्या फोनला जोडलेले बँक खातंच हॅक होण्याची भीती आहे. 

तुम्ही काबाड कष्ट करून कमावलेली कित्येक वर्षांची कमाई धोक्यात आहे. कारण बँकेत असलेल्या तुमच्या कमाईवर हॅकर्सची नजर पडलीय. तब्बल दहा बँकांचा डेटा चोरी झालेला असून काही बँकांमधून पैसेही गायब झाल्याचं वृत्त आहे. भारतातल्या 10 बँकांच्या खात्यांची गोपनीय माहिती हॅक केल्याची सूत्रांची माहिती आहे. काही खात्यांमधून पैसेही गायब झालेले आहेत.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयचे एमडी आणि सीईओ ए. पी. होता यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एनपीसीआय या बँकांच्या संपर्कात असून या बँकांच्या खात्यांचे फॉरेंसिक ऑडिट करण्यात येत आहे. यासंदर्भात चौकशी सुरू असून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एनपीसीआयमध्येच डेटा हॅक झाल्याची शक्य़ता वर्तवण्यात येत आहे.