www.24taas.com, नवी दिल्ली
जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर खळबळजनक आरोप लावले आहेत. स्वामी यांनी हा आरोप केला आहे की, सोनिया आणि राहुलने जवाहरलाल नेहरू यांच्या ट्रस्टला आपली खाजगी संपत्ती बनवून टाकली आहे.
याप्रकारे त्यांनी १६०० करोड रूपयाच्या संपत्तीवर कब्जा केला आहे. काँग्रेसने सुब्रमण्यम स्वामींच्या ह्या आरोपांचा इन्कार करत त्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले आहे. सोनिया गांधी आणि राहुल यांच्यावर एक खोटी कंपनी चालविण्याचे आणि सरकारी सुविधांचा दुरूपयोग केल्याचा आरोप केला आहे.
सोनिया गांधींनी एक ट्रस्टचे खाजगी कंपनीमध्ये रूपांतर करून घेतले आहे. आणि त्याच्यावर स्वत:चा अधिकार जमवला आहे. या कंपनीत सोनिया आणि राहुल गांधी यांचे ७६ टक्के शेअर असल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनंतर आता सरळ काँग्रेस अध्यक्षांवरच आरोप होऊ लागले आहेत.