www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांनी सूत्रं हातात घेतल्यानंतर लगेचच बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आलेत. गुरुवारी बाजाराची सुरुवात एका नव्या जोमात झाली. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्ह दिसत आहेत.
बाजार उघडताच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मुल्यात सुधारणा झाली. सुरुवातीलाच ९८ पैशांच्या मजबुतीसोबत ६६.१० वर रुपयाचं मूल्य होतं. थोड्याच वेळात हे मूल्य आणखी सुधारत ६५.७३ वर पोहचलं.
बुधवारी, रघुराम राजन यांनी आरबीआयच्या गव्हर्नरपदाची सूत्रं आपल्या हातात घेतली होती. त्याचा परिणाम आंतर बँक चलन बाजारवरही दिसून आला. डॉलरच्या रुपयात ५६ पैशांनी मजबूत होऊन ६७.०८वर बंद झाला होता. सीरियाचं संकट समोर असताना बाजारानं नवे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर एकप्रकारे आपला विश्वासच व्यक्त केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.