www.24taas.com, अहमदाबाद
अटीतटीच्या अहमदाबाद टी-20 मध्ये टीम इंडियाने बाजी मारली. भारताने पाकवर 11 रन्सने मात केली. या विजयासह दोन मॅचेसची टी-20 सीरिज 1-1 ने बरोबरीत राखण्यात टीम इंडियाला यश आलं. 72 रन्सची धुवाँधार इनिंग खेळणार युवराज सिंग टीम इंडियाच्या विजयाचा ख-याअर्थाने शिल्पकार ठरला.
पाकिस्तानकडून कर्णधार मोहम्मद हाफिजने शानदार खेळी करत २६ चेंडुत ५५ धावा केल्या. त्याने ६ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार लगावले.
सुरूवातीला नासीर जमशेद आणि अहमद शेहजाद ७४ धावांची सुरूवातीची भागीदारी केली. त्यानंतर हे दोघे बाद झाल्यावर उमर अकमल आणि हाफिज यांनी अर्धशतकी खेळी केली.
सुरूवातीला टी-२० सीरीजमधल्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानसमोर १९३ रन्सचं टार्गेट ठेवल होतं. भारतानं ५ विकेट गमावत १९२ रन्सचा टप्पा गाठला.
या खेळीत युवराज सिंगची खेळी महत्त्वपूर्ण ठरली... त्याने ३६ बॉल्समध्ये ७२ रन्स ठोकले. यामध्ये ७ सिक्स आणि ४ फोरचा समावेश होता. मॅचच्या शेवटच्या टप्प्यात आणखी एक सिक्स ठोकण्याच्या प्रयत्नात शोएब मलिकनं त्याची कॅच अलगद पकडला.
भारताला बाराव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मोठा धक्का बसला. फॉर्मात आलेला विराट कोहली (२७ रन्स) धावबाद झाला. यावेळी भारतानं ८८ रन्स केले होते.
गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे जोडीने पुन्हा भारताला दमदार सलामी दिली. पण, दोन्ही सलामीवीर ४४ धावांवर भारताला तंबूत परतले. गौतम गंभीर बाद झाला. गंभीरने उमर गुलच्या पहिल्याच षटकात लागोपाठ तीन चौकार ठोकले. परंतू, ओव्हरच्या पाचव्या बॉलवर गंभीर पायचीत झाला. गंभीरने ११ बॉलमध्ये २१ रन्स दिले. राहाणेनं ५३ रन्स केले. मोहम्मद इरफानच्या एका यॉर्करवर युवराजच्या पायाला दुखापत झाली. पण, युवी पुन्हा खेळायला सज्ज झाला.
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद हाफिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात रविंद्र जडेजाच्या जागेवर आर. अश्विनला संधी देण्यात आली. तर पाकिस्ता्नने कोणताही बदल केला नाही.