मुंबई : सामान्यांनाच नाही तर डॉक्टरांना आणि वैद्यकीय तज्ज्ञांनाही हादरवून सोडणाऱ्या काही घटना २०१५ या वर्षात उघडकीस आल्या. विश्वास ठेवायला कठिण असल्या तरी या घटना घडल्या हे मात्र खरं...
दिवसातून १२ हजार वेळा शिंकणारी मुलगी
१२ वर्षांच्या कॅटलिन थोर्नली ही मुलीला एक आश्चर्यकारक आजार असल्याचं निदर्शनास आलंय. कॅटलिन दिवसातून जवळपास १२,००० वेळा म्हणजेच प्रति मिनिट २० वेळा शिंकते... हे खरोखरच अविश्वसनीय आहे. ती सतत वेदनेत असतेच शिवाय यामुळे तिची प्रकृतीही बिघडलीय... साध्या जेवणासाठीही तिला मोठे कष्ट घ्यावे लागतात. कॅटलिन सध्या सातव्या वर्गात शिकतेय. या आजारामुळे ती निटसं झोपूही शकत नाही.
'मेंदू'विना जन्मलेल्या बाळानं साजरा केला पहिला वाढदिवस
क्वचितच आढळणारा अशा आजारासहित एक बाळ जन्मलं... जन्मत:च या बाळाची अर्धी कवटी आणि मेंदूचा काही भाग गायब होता... आणि तरीही हे बाळ जिवंत होतं. हे पाहून डॉक्टरांनाही चांगलाच धक्का बसला. हे बाळ जास्तीत जास्त आठवडाभर जगू शकेल, असं भाकीत डॉक्टरांनी केलं होतं. परंतु, आश्चर्य म्हणजे या बाळानं आपला पहिला वाढदिवसही साजरा केलाय.
या गावात मुली मोठं झाल्यावर 'मुलगा' बनतात!
या छोट्याशा गावाचे नाव सलिनास आहे. हे एक गणराज्य असून येथे प्रत्येक पन्नास मुलींमध्ये एक मुलगी १२ वर्षांची झाल्यानंतर मुलगा होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हे एक मेडिकल प्रकरण आहे, ज्याचे नाव स्यूडोहरमोफ्रोडाइट आहे. यामध्ये मुली जन्माला तर येतात पण त्या किशोरवस्थेत आल्यानंतर त्यांचा विकास होऊन ते परुष बनतात.
एका आजारामुळे इथं जन्माला आलेल्या मुलांमध्ये एक एनझाइम तयार होत नाही. त्यामुळे गर्भाशयात पुरूषाचे स्केस हार्मोन-डिडाइज्रो टेस्टोसटेरोन तयार होत नाही. त्यामुळे असा मुलगा जन्मानला आल्यावर त्याल अंडकोष नसते, त्यामुळे त्याच्या शरिरावर योनी असल्यासारखे वाटते. 12व्या वर्षी टेस्टोस्टेरोन वाढते आणि त्यामुळे पुरूषाचे जननांग दिसू लागते.
बाळाची हाक ऐकून कोमात गेलेली आई उठून बसली
खरी वाटणार नाही पण ही घटना अमेरिकेच्या नॉर्थ केलोरिनामध्ये घडलीय. २३ वर्षांच्या शेरी काले नावाची महिला बाळाला जन्म देण्यापूर्वीच ब्लड-क्लॉट उघडल्यानं कोमामध्ये गेली होती. त्यामुळे डॉक्टरांनीही तिच्या जगण्याची आशा सोडली होती... आणि अशातच आपल्या नवजात बाळाचं रडणं ऐकून शेरीनं डोळे उघडले.
सहा दिवसांच्या बाळावर हृदय प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया
अमेरिकेत अवघ्या सहा दिवसांच्या एका बालकावर हृदय प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया पार पडली.... हा एक वैज्ञानिक चमत्कारच होता. उल्लेखनीय म्हणजे, हे प्रीमॅच्युअर बेबी म्हणजेच वेळेच्या आधीच जन्माला आलं होतं... आणि जन्मत:च त्याच्या हृदयामध्ये दोष आढळला होता.
यामुळे, डॉक्टरांनी अवघ्या सहा दिवसांच्या या बाळावर तब्बल दहा तासांची शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवले. या बाळाचं नामकरण 'ऑलिव्हर होप' असं करण्यात आलंय.