लंडन : महिला आणि पुरूषांच्या सेक्सची इच्छा जागृत होण्याची वेग-वेगळी वेळ असते. एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. महिलांनना झोपण्यापूर्वी रात्री ११.२१ वाजण्याच्या सुमारास यौन संबंध बनविण्याची इच्छा होते. तसेच पुरूषांना सकाळी ७ वाजून ५४ मिनिटांच्या आसपास यौन संबंध ठेवण्याची इच्छा होते.
सर्वेक्षणात असा निष्कर्ष समोर आला की महिलांना रात्री ११ वाजेपासून रात्री दोन वाजेपर्यंत यौन संबंध बनविण्याची इच्छा अतिउच्च असते तर पुरूषांना सकाळी पाच वाजेपासून नऊ वाजेपर्यंत यौन संबंध बनिविण्याची इच्छा अधिक असते.
एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार पुरूष नाश्त्यापूर्वी यौन संबंध बनविण्यास तयार असतात. तर महिला रात्रीच्यावेळी यौन संबंध बनविण्यास तयार असतात. ब्रिटनमधील २३०० व्यक्तींवर सर्वेक्षण करण्यात आले. तसेच ज्या साथीदाराची यौन संबंध ठेवण्याची समान प्रवृत्ती आहे, अशांशीच ते लग्न करतात.
सेक्स टॉइज बनविणारी कंपनी लव हनी तर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यानुसार ६८ टक्के महिला आणि ६३ टक्के पुरूषांनी अशा व्यक्तींशी प्रेम संबंध बनविले ज्यांची यौन रूची वेगवेगळी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.