मधुचंद्राच्या रात्री पत्नी पतीला का देते दुधाचा ग्लास?

मधुचंद्राचा सीन तुम्ही अनेकवेळा चित्रपटांत पाहिला असेल. सुहागरातच्या वेळी पत्नी पतीला दुधाचा ग्लास देताना दिसते. मात्र वास्तवात यामागेही काही अलिखित कारणे आहेत. आरोग्याच्या दृष्टीनेही रात्रीचे दूध पिण्याने चांगला फायदा होतो. 

Updated: Dec 26, 2015, 04:20 PM IST
मधुचंद्राच्या रात्री पत्नी पतीला का देते दुधाचा ग्लास? title=

नवी दिल्ली : मधुचंद्राचा सीन तुम्ही अनेकवेळा चित्रपटांत पाहिला असेल. सुहागरातच्या वेळी पत्नी पतीला दुधाचा ग्लास देताना दिसते. मात्र वास्तवात यामागेही काही अलिखित कारणे आहेत. आरोग्याच्या दृष्टीनेही रात्रीचे दूध पिण्याने चांगला फायदा होतो. 

मधुचंद्राच्या दिवशी पतीने दूधाचे सेवन केल्यास येणाऱ्या दाम्पत्य जीवनात पवित्रता कायम राहते. आरोग्य चांगले राहते. धनसंपदेची कमतरता भासत नाही, असा समज आहे. मधुचंद्राच्या दिवशी पतीला दूध देण्यामागे काही ठिकाणी जुनी परंपराही आहे. या परंपरेनुसार घरच्या लक्ष्मीच्या हातून नव्या जीवनाचा भागोद्य होत असल्याचेही म्हटले जाते. 

रात्रीचे दूध प्यायल्याने दिवसभरातील थकवा दूर होऊन चांगली झोप मिळण्यास मदत होते. तसेच केशरमुळे ताकद वाढते. यामुळे मधुचंद्राच्या दिवशी पतीला केशर मिसळलेले दूधही दिले जाते.