मुंबई : महिलांना सेक्समध्ये उदासिनता येण्याचे अनेक कारणं आहेत. वाढते वय आणि इतर काही शारीरिक कारणही असतात. सेक्स प्रति महिला उदासीन होण्याचे काही प्रमुख कारणं असतात. ते पुढील प्रमाणे
१) आपसातील संबंधात आलेल्या दुराव्यामुळे महिलांचे सेक्स संदर्भात उदासीनता दिसून येते. या कारणांमध्ये पार्टनरची सेक्स समस्या, त्याची भावनात्मक संतुष्टी न होणे, मुलं न होणे या कारणांमुळे दुरावा निर्माण होऊ शकतो.
२) नोकरीत तणाव, साथीदाराचा दबाव आणि सेक्शुलिटीवर इमेजमुळे सेक्स करण्याची प्रतिक्रिया नकारात्मकता असते.
३) टेस्टोरॉनचा स्तर खाली गेल्याने महिलांमध्ये सेक्समध्ये रुची कमी होते. कोणत्याही महिलांमध्ये टेस्टोरॉनचा स्तर २० वर्ष आपल्या उच्च स्तरावर असतो आणि तो हळूहळू वाढत्या वयानुसार कमी होतो. मीनपॉज होईपर्यंत ही इच्छा थोडीफार राहते.
४) महिलांमध्ये सेक्स प्रति अनिच्छाचे कारण मेडिकल प्रॉब्लेम असू शकते. मानसिक आजार, डिप्रेशन, तणाव आणि दबाव या स्थितीत ही इच्छा हळू हळू कमी होते. तसेच फायब्रॉएड आणि थायराइड सारख्या आजारात सेक्सची क्षमता मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या घटू लागते.
५) सेक्स इच्छा कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण असेही की डिप्रेशन कमी होण्यासाठी ज्या गोळ्या घेतल्या जातात त्याचा दुष्परिणाम होतो.
६) गर्भ निरोधक गोळ्या, ब्लड़ प्रेशर कमी करणाऱ्या गोळ्याचा वापर केल्यास सेक्सची इच्छा कमी होतो.
७) महिलांमध्ये वाढत्या वयामुळे एंड्रोजनचा स्तर कमी होतो. त्यामुळे त्या महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होते.