मुंबई : ऑफीसमध्ये अनेक जण चहा किंवा मग कॉफी मोठ्या प्रमाणावर पितात. कॉफी प्यायल्यामुळे काम करण्याची क्षमता वाढते अशी अनेकांची समझ आहे. पण कॉफी प्यायल्याने कामाची क्षमता वाढते ही समझ चूकीची असल्याचं अनेक संशोधनात समोर आलंय.
कामाच्या ठिकाणी आपण किती कॉफी पितो हे जर आपल्याला माहित नसेल तर कॉफीचे शरिरावर अनेक वाईट परिणाम होतात. कॉफी प्यायल्याने फक्त मानसिकता बदलते.
सहकर्मचाऱ्यांसोबत एकत्र कॉफी प्यायल्याने ऊर्जा तयार होते. पण कामाचं तणाव आहे त्यावेळेस कॉफी पिल्याने त्याचा शरिरावर वाईट परिणाम होतो. तणावमध्ये असतांना कॉफी प्यायल्याने रक्तदाब वाढतो.
कॉफी पिण्याचे प्रमाण योग्य असावं आणि तणाव दूर करण्यासाठी कॉफी प्यायल्याने त्याचा फायदा होत नाही. कॉफी पिण्यासाठी सहकर्मचाऱ्यांसोबत तुम्ही जाऊन ती पिऊ शकता. पण त्याचं अतिसेवन करू नये.