व्हिडिओ : आईच्या पोटात पाहायला मिळाला अद्भूत नजारा!

आईच्या पोटात असलेल्या अर्भकाच्या हलक्याशा हालचालींनीही आईच्या अंगावर रोमांच उभे राहतात. पण, हेच अर्भक आईच्या पोटातच असताना गाण्याच्या तालावर टाळ्या वाजवताना पाहायला मिळालं तर... 

Updated: Apr 3, 2015, 02:34 PM IST
व्हिडिओ : आईच्या पोटात पाहायला मिळाला अद्भूत नजारा! title=

नवी दिल्ली : आईच्या पोटात असलेल्या अर्भकाच्या हलक्याशा हालचालींनीही आईच्या अंगावर रोमांच उभे राहतात. पण, हेच अर्भक आईच्या पोटातच असताना गाण्याच्या तालावर टाळ्या वाजवताना पाहायला मिळालं तर... 

होय, सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर असाच एक व्हिडिओ वायरल झालाय. या व्हिडिओमध्ये आईच्या गर्भातच असलेलं अर्भक कविता ऐकताना टाळ्या वाजवताना दिसतंय. 

या व्हिडिओमध्ये १४ आठवड्यांचं हे अर्भक नर्सरी रायम 'इफ यू हॅप्पी...' ही कविता ऐकल्यानंतर टाळ्या वाजवताना दिसतंय. 

अल्ट्रासाऊंड स्कॅनिंगमध्ये हे आईसह इतरांनाही सुखावणारं चित्र दिसू शकतंय. हा व्हिडिओ जेन कार्डिनलच्या यू-ट्यूब चॅनलवर २६ मार्च रोजी पोस्ट केला गेलाय आणि आत्तापर्यंत हा व्हिडिओ ५५ लाखांहून जास्त व्यक्तींनी पाहिलाय. 

व्हिडिओ पाहा :- 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.