थॉयराईडची समस्या असेल, तर हा आहार महत्वाचा आहे...

थॉयराईडमध्ये अनियमितता एक अशी गोष्ट आहे, ज्यामुळे थॉयराईडच्या कामात मोठा प्रभाव दिसून येतो. सध्या थॉयराईडचा प्रॉब्लेम अनेक लोकांमध्ये पाहायला मिळतो. पुरूषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 17, 2017, 04:02 PM IST
थॉयराईडची समस्या असेल, तर हा आहार महत्वाचा आहे... title=

नवी दिल्ली : थॉयराईडमध्ये अनियमितता एक अशी गोष्ट आहे, ज्यामुळे थॉयराईडच्या कामात मोठा प्रभाव दिसून येतो. सध्या थॉयराईडचा प्रॉब्लेम अनेक लोकांमध्ये पाहायला मिळतो. पुरूषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. 

थॉयराईड गळ्याच्या समोर बटरफ्लाय आकारात दिसून येतो. थॉयरॉईड हार्मोन शरीरातील मेटाबोलिज्मला नियंत्रित करतात. किती वेगाने तुम्ही कॅलरी बर्न करतात, किती वेगात तुमचे हार्ट बीट होतात, हे थॉयरॉईडवर असतं.

खालील गोष्टी थॉयरॉईडच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात...!

हिरव्या पाले भाज्या : आपल्या जेवणात हिरव्या पाले भाज्या आणि सॅलडचा वापर करा, यात मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतं. यात मिनरलही मोठ्या प्रमाणात असतं.

नटस :जेवणात काजू, बदाम तसेच पंम्पकीनच्या बियांचा वापर करा, यात आयरन आणि सिलीनियमचा मोठा स्त्रोत आहे. जो थॉयरॉईडच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.

सी फूड : जर तुम्ही सीफूड खात असाल, तर थॉयरॉईड आरोग्यात सुधार होईल. कारण सीफूडमध्ये आयोडीन, मिनरल असतं, आणि थॉयरॉईडची क्रिया करण्यास मदत होते. मासे, झिंगा, समुद्री शैवाल आयोडिनचा प्रमुख स्त्रोत आहे.

मीठ : योग्य पद्धतीने क्रिया करण्यासाठी थॉयरॉईडला आयोडिनची गरज असते. यासाठी आयोडाइज्ड मीठाचा वापर करा.

अंडी : अंड्यात सिलिनियम उपलब्ध असते, मिनरल थॉयरॉईड हार्मोन T4 आणि T3 मध्ये रूपांतरीत करतो.