केस गळतीवर मेथी रामबाण औषध

प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाक घरात सहजरित्या उपलब्ध होणारी मेथी किती बहुगुणी आहे, हे आपल्याला माहीत देखील नाही. बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीचे फायदे हे अमूल्य आहेत. मेथीमुळे केसात होणारा कोंडा कमी होतो. त्याचबरोबर चेहरा, पोट आणि मूतखडा यासारख्या आजारावर रामबाण उपाय आहे. ही मेथी आपण केसांना लावल्यानंतर कोंडा सुद्धा कमी होतो. आपण आज मेथीचे काही फायदे जाणून घेणार आहोत.

Updated: Sep 12, 2014, 03:21 PM IST
केस गळतीवर मेथी रामबाण औषध title=

मुंबई : प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाक घरात सहजरित्या उपलब्ध होणारी मेथी किती बहुगुणी आहे, हे आपल्याला माहीत देखील नाही. बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीचे फायदे हे अमूल्य आहेत. मेथीमुळे केसात होणारा कोंडा कमी होतो. त्याचबरोबर चेहरा, पोट आणि मूतखडा यासारख्या आजारावर रामबाण उपाय आहे. ही मेथी आपण केसांना लावल्यानंतर कोंडा सुद्धा कमी होतो. आपण आज मेथीचे काही फायदे जाणून घेणार आहोत.

कोंडा कमी होतो :

केसात कोंडा होणे ही किरकोळ समस्या मानली जाते. डोक्यावरची त्वचा कोरडी किंवा डेड स्किन सेल्समुळे देखील डॅड्रफ होतो. कोंड्यापासून सुटका होण्यासाठी तुम्ही कित्येक एंटी-डॅड्रफ शॅम्पू वापरून थकला असाल पण, काही उपयोग होत नाही. आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सूचवितो. या उपायमुळे तुम्हाच्या केसांमधला कोंडा दूर होण्यास मदत होईल. त्यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट करून घ्या. मग तुम्ही ही पेस्ट आणि दही एकत्र करून स्कॅल्प आणि केसांच्या मुळापर्यंत लावा. त्याचबरोबर मसाज देखील करा. मग 30 मिनिटाने केस धुऊन घ्या.

केस मजबूत होतात :

मेथीचे दाणे केसांच्या मुळाला मजबूत करून डॅमेज केसांना पुनर्जीवित करतात. यात प्रोटीन असून मेथीच्या दाण्यांचा जर डाइटमध्ये यांचा समावेश केला तर केस हेल्दी आणि सुंदर होतात. त्यासाठी भिजविलेल्या मेथीच्या पेस्टमध्ये दोन मोठे चमचे खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेल एकत्र करून केसात लावा. केस सूकल्यानंतर पाण्याने धुऊन घ्या. 
पचण्यासाठी फायदेशीर :

मेथीच्या दाण्याचे सेवन केल्यानंतर पोट दुखणे आणि जळजळ कमी होते. त्याच बरोबर पचन क्रिया देखील मजबूत होते. पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी मेथीच्या दाण्यांची पेस्ट आणि किसलेले आले एकत्र करून एक चमचा खाल्याने पोटासंबधीत सर्व रोग दूर होतात.

मधुमेह पण कंट्रोल होतो :

मेथीच्या दाण्यापासून रक्तातील साखर कंट्रोल होण्यास देखील मदत होते. सर्वेद्वारे असे सांगण्यात आले आहे की, मधुमेह झालेल्यांनी मेथीचे सेवन केल्यामुळे त्यांना खूप फायदा झाला आहे. मेथीमध्ये असलेल्या अॅमीनो अॅसिड तत्व पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिनचे स्राव वाढवितो. तो शरीरामधील रक्तातील साखर समप्रमाणात आणतो. यासाठी मेथीचे दाणे पाण्यात रात्रभर भिजत घालून सकाळी त्याचे पाणी गाळूण प्यायल्याने काही प्रमाणात मधुमेह कमी होता. 

किडनीसाठी उपयुक्त :

मेथीचे सेवन केल्यामुळे किडनी चांगली रहाते. मूतखडासाठी मेथी हा फायदेशीर उपाय मानला जातो. त्यामुळे मूतखडा हा लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडतो. तसेच मेथी दाणे एक छोटा चमचा, लिंबू रस आणि मध खाल्याने ताप काही प्रमाणात कमी होतो. 

पिंपल्स देखील कमी करते :

पिंपल्स आणि ब्लॅकहेड ट्रीडमेंटसाठी मेथीचे दाणे फायदेशीर असतात. त्यासाठी मेथीच्या दाण्यांची पेस्ट करून घेणे. आणि त्यात थोडे मध एकत्र करून घेतल्यानंतर हे मिक्सचर रात्री झोपण्याच्या आधी पिंपल्सवर लावावे. आणि सकाळी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घेणे. हा उपाय नेहमी केल्यानंतर तुम्हाला फरक दिसेल.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त :

मेथीच्या दाण्यात फाइबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्याने एक्सट्रा कॅलरी बर्न होतात. सकाळी मेथींच्या दाण्यांचे दोन ग्लास पाणी हा यावर दुसरा उपाय आहे. मेथीचे पाणी बनविण्यासाठी एक मोठा चमचा मेथीचे दाणे घेऊन त्यात दोन ग्लास पाणी रात्रभर भिजत घातल्यानंतर सकाळी ते गाळून पाणी प्यावे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.