समुद्रातील जीव तुम्हांला ठेवतील चिरतरूण!

प्रत्येकाला आपलं तारूण्य निरंतर राहवं अशी खूप इच्छा असते. त्याबद्दल संशोधकही प्रयत्न करत आहेत. समुद्रातील उत्सर्जित जीवाणूंपासून तारूण्य जपण्यासाठी प्रयोग करण्यात येत असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली आहे. या दोन्ही जीवाणूंमध्ये कोलेजनचे वय थांबवण्याची शक्यता असते.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 4, 2012, 06:39 PM IST

www.24taas.com, लंडन \
प्रत्येकाला आपलं तारूण्य निरंतर राहवं अशी खूप इच्छा असते. त्याबद्दल संशोधकही प्रयत्न करत आहेत. समुद्रातील उत्सर्जित जीवाणूंपासून तारूण्य जपण्यासाठी प्रयोग करण्यात येत असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली आहे. या दोन्ही जीवाणूंमध्ये कोलेजनचे वय थांबवण्याची शक्यता असते.
लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठाच्या संशोधकांनी समुद्रातील जीवाणूंच्या पेशींची तपासणी केली. त्यांनी विशेषतः एकीनोडरमस समुहाच्या समुद्रातील उत्सर्जीत जीवाणूंची तपासणी केली होती.
त्यांना संदेशवाहक अणुंच्या पेशी मिळाल्या ज्यांना कोशिका उत्सर्जित करतात आणि या कोशिका दुसऱ्या कोशिकांना सांगतात कि त्यांना पुढे काय करायचे आहे. संदेशवाहक अणुंना पेपटाइट या नावाने ओळखले जाते.
या संशोधनाचा निकाल पीएलओएस वन आणि जनरल एण्ड कम्पॅरेटिव एंडोक्रोनोलॉजी नावाच्या जनर्लसमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.