दूषित पाण्यापासून सावधान... होऊ शकतो कॅन्सर!

पाणी शुद्ध करण्याच्या काही पद्धती योग्य नाहीत हे नेहमीत ऐकण्यात येतं. कारण त्यामुळे पाण्यातील पोषक तत्त्वे नष्ट होतात. वॉटर प्यूरिफायरच्या वापराने आरओ, यूव्ही, आयोनायझिंग पद्धत पाण्यातील बॅक्टेरिया आणि हेव्ही मेटलला हटवण्याचं काम करते. त्यामुळे पोषक तत्त्वांवर खास परिणाम होत नाही. दूषित पाण्यात अॅल्यूमिनिअमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे न्युरोलॉजिक डिसऑर्डर, रक्ताची कमी तसंच रक्तवाहिन्या कमजोर होणं, दातांना पिवळेपणा येणं, हाडांचे रोग होणं यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागण्याच धोका आहे.  

Updated: Apr 11, 2015, 07:25 PM IST
दूषित पाण्यापासून सावधान... होऊ शकतो कॅन्सर! title=

मुंबई : पाणी शुद्ध करण्याच्या काही पद्धती योग्य नाहीत हे नेहमीत ऐकण्यात येतं. कारण त्यामुळे पाण्यातील पोषक तत्त्वे नष्ट होतात. वॉटर प्यूरिफायरच्या वापराने आरओ, यूव्ही, आयोनायझिंग पद्धत पाण्यातील बॅक्टेरिया आणि हेव्ही मेटलला हटवण्याचं काम करते. त्यामुळे पोषक तत्त्वांवर खास परिणाम होत नाही. दूषित पाण्यात अॅल्यूमिनिअमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे न्युरोलॉजिक डिसऑर्डर, रक्ताची कमी तसंच रक्तवाहिन्या कमजोर होणं, दातांना पिवळेपणा येणं, हाडांचे रोग होणं यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागण्याच धोका आहे.  

दूषित पाणी 
अधिक क्लोराईडयुक्त पाणी वारंवार पिल्याने आतडे, मुत्रपिंड, रक्तवाहिन्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

बाटलीबंद पाणी 
प्लॅस्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी कार्सिनोजेनिक केमिकलचा वापर केला जातो. बाटलीचे तापमान वाढल्यानंतर हे रसायन पाण्यामध्ये मिसळते. ज्यामुळे कॅन्सर आणि महिलांमध्ये हार्मोन्सची गडबड होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्टील अथवा इतर धातुच्या बाटल्यांचा वापर करावा. घरात पिण्याचं पाणी साठवण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर करू शकता.

काय खबरदारी घ्याल? 
प्युरीफायर मशीनची ८-९ महिन्यात सर्व्हिसिंग करून घ्यावी. प्युरीफायर मशीन वापरणे शक्य नसल्यास पाणी उकळून त्यानंतर थंड करून पिण्यासाठी वापरा. एकदा उकळलेलं पाणी २४ तासांच्या आत वापरा.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.