डेंग्यूची लस तयार, 5-10 हजार रुपये असेल किंमत

लस बनवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी सीरमनं डेंग्यूवरील उपचारासाठी एक जैविक लस तयार केलीय. कंपनीचा दावा आहे की, ही लस डेंग्यूच्या चार सीरोटाइप (DEN-1, DEN-2, DEN-3 and DEN-4) यांच्याशी मुकाबला करण्यास सक्षम आहे.

Updated: Sep 22, 2015, 05:16 PM IST
डेंग्यूची लस तयार, 5-10 हजार रुपये असेल किंमत title=

पुणे: लस बनवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी सीरमनं डेंग्यूवरील उपचारासाठी एक जैविक लस तयार केलीय. कंपनीचा दावा आहे की, ही लस डेंग्यूच्या चार सीरोटाइप (DEN-1, DEN-2, DEN-3 and DEN-4) यांच्याशी मुकाबला करण्यास सक्षम आहे.

सीरम इन्स्टिट्यूट आता विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या 'फास्ट ट्रॅक अप्रूवल'च्या तयारीत आहे. सरकारकडून परवानगी मिळताच डेंग्यू पीडित रुग्णांसाठी इंजेक्सच्या रुपात हे औषध उपलब्ध होईल. या लसीच्या एका डोजची किंमत 5 हजारापासून 10 हजार रुपयांपर्यंत असेल. संशोधकांचं म्हणणं आहे की, उपचारासाठी औषधाचा एकच डोज पुरेसा असेल.

आणखी वाचा - बकरीचं दूध आणि पपईची पानं डेंग्यूवर रामबाण उपाय

कंपनीचे सीईओ अदर पूनावाला यांना सांगितलं, 'सीरमनं अमेरिकन बायोटेक्नोलॉजी कंपनी विस्तोरासोबत मिळून ही लस तयार केलीय. परवानगी मिळताच 12-18 महिन्यांच्या आत ही लस बाजारात उपलब्ध होईल, अशा आशा व्यक्त करण्यात येतेय.'

जर औषधाला मंजूरी मिळत असेल तर सीरम डेंग्यूच्या उपचारासाठी जैविक औषध तयार करणारी पहिली कंपनी असेल. तर सॅनोफी आणि नोवार्टिस सारख्या मोठ्या कंपन्या सुद्धा पाच वर्षांच्या आत डेंग्यूची लस लॉन्च करू शकतात. 

आणखी वाचा - फणफणत्या तापात एसी किंवा पंखा बंद करू नका : डॉक्टर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.