नवी दिल्ली : आधुनिक जीवनशैलीच्या दुष्परिणामांना तुम्हाला दूर ठेवायचं असेल तर काजू, बेरीज आणि चॉकलेट खा...! होय... तुम्ही या गोष्टी खायला हव्यात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही खास पदार्थ तणाव दूर ठेवण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी मदत करतात.
'हेल्प मी डॉक' या ऑनलाईन स्वास्थ्य पोर्टलचे संस्थापक सुव्रो घोष यांनी तणाव दूर करण्यात मदत करणाऱ्या काही पदार्थांची यादीच जाहीर केलीय.
अॅवोकॉडो : अॅवोकॉडोमध्ये विटॅमिन ई, विटॅमिन बी आणि पोटॅशिअमसहीत अनेक पोषक तत्त्व भरलेले असतात. भूक आणि रक्तातील शर्करेचं प्रमाण नियंत्रित केल्यामुळे तणावाला सहज दूर सारता येतं.
काजू : काजूमध्ये झिंकचं प्रमाण जास्त असतं. झिंक हे मानसिक तणाव आणि अस्वस्थतेला दूर सारण्यासाठी मदत करतं.
बेरी (पेरू, स्ट्रॉबेरीसारखी फळं) : बेरी विटॅमिन सीचे महत्त्वाचे स्रोत आहेत. या पदार्थांच्या सेवनामुळे तणाव दूर होतो.
चॉकलेट : चॉकलेट तुम्हाला नक्कीच आवडतं असणार... हेच चॉकलेट आता तणावावर औषध म्हणूनही तुम्ही खाऊ शकता. चॉकलेट तुम्हाला 'फिल गुड फॅक्टर' म्हणून मूड चांगला करण्यासाठी मदत करतं.
ग्रीन टी : मानसिक ताण दूर करण्यासाठी आणि मेंदूतील कोशिकांना सक्रिय करण्यासाठी ग्रीन टी तुम्हाला मदत करते.
केळी : केळ्यात पोटॅशिअमचं प्रमाण मोठं असतं. हे खनिजाचं एक प्राकृतिक स्रोत आहे. हृदयाच्या ठोक्यांना सामान्य ठेवण्यासाठी केळी मदत करतात. मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहचवण्याचंही काम केळी करतात इतकंच नाही तर शरीरात पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठीही केळी मदत करतात.
अक्रोड : अक्रोडच्या सेवनामुळे तणावाशी लढण्यात तसंच शांत आणि प्रसन्न राहण्यास मदत मिळते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.