पुदिनाचा चहा घ्या आणि वाढवा स्मरणशक्ती

तुम्ही जर कोणत्या गोष्टी पटकन विसरत असाल किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला त्रास होत असेल तर पुदीनाची चहा प्या. कारण एका संशोधनातुन हे समोर आलयं की पुदिनाची चहा प्यायल्याने माणसाचं आयुष्य निरोगी आणि उत्साही राहते. शिवाय स्मरणशक्तीत सुधारणा देखील होऊ शकते.

Updated: May 3, 2016, 03:54 PM IST
पुदिनाचा चहा घ्या आणि वाढवा स्मरणशक्ती   title=

लंडन : तुम्ही जर कोणत्या गोष्टी पटकन विसरत असाल किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला त्रास होत असेल तर पुदीनाची चहा प्या. कारण एका संशोधनातुन हे समोर आलयं की पुदिनाची चहा प्यायल्याने माणसाचं आयुष्य निरोगी आणि उत्साही राहते. शिवाय स्मरणशक्तीत सुधारणा देखील होऊ शकते.

हे संशोधन करण्यासाठी १८० जणांचा अभ्यास करण्यात आला. त्यांना पुदीन्याची चहा, कॅमोमिल चहा, गरम पाणी असे काही दिवस पिण्यास सांगितले. संशोधनाच्या परिणांमानुसार, कॅमोमिल आणि गरम पाणी पिणाऱ्यांच्या तुलनेत पुदीन्याची चहा पिणाऱ्या लोकांच्या स्मरणशक्तीत महत्वपूर्ण सुधारणा झाली.

कॅमोमिल चहा पिणाऱ्यांमध्ये एकाग्रता क्षमता कमी वाटली. हे संशोधन आताचं लंडनमध्ये आयोजित केलेल्या मानसिक सोसायटीच्या वार्षिक परिषदेत दाखवण्यात आले.