गर्भवती महिलांचे प्राण वाचवणार 'स्पेस सूट'!

आई बनणाऱ्या प्रत्येक स्त्री साठी एक महत्वाची बातमी... प्रसूतीच्या दरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे अनेक महिलांना आपले प्राण गमवावे लागतात. यामुळे डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी मिळून प्रसूतीच्या वेळी महिलांसाठी एका रक्षण कवच शोधून काढलंय... याचं नाव आहे 'स्पेस सूट'.

Updated: May 2, 2016, 10:53 PM IST
गर्भवती महिलांचे प्राण वाचवणार 'स्पेस सूट'! title=

नवी दिल्ली : आई बनणाऱ्या प्रत्येक स्त्री साठी एक महत्वाची बातमी... प्रसूतीच्या दरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे अनेक महिलांना आपले प्राण गमवावे लागतात. यामुळे डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी मिळून प्रसूतीच्या वेळी महिलांसाठी एका रक्षण कवच शोधून काढलंय... याचं नाव आहे 'स्पेस सूट'.

आईचं रक्षण करणारा 'स्पेस सूट'

आत्तापर्यंत आपण स्पेस सूट हा केवळ अंतराळात प्रवास करणाऱ्यांसंबंधात ऐकला असेल... पण, आता मात्र असाच स्पेस सूट गर्भवती महिलांसाठीही उपयोगी ठरणार आलाय. 

हाच स्पेस शूट नवजात बालकाच्या जन्मावेळी आईचं रक्षण करणारा ठरणार आहे. नासाच्या शोधाने प्रेरणा घेऊन वैज्ञानिकांनी हा अनोखा सूट गर्भवती महिलांना समोर ठेवून बनवण्यात आलाय.

महिलांसाठी ठरणार वरदान

विश्व आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगात दरवर्षी साडे तीन लाख महिलांचा मृत्यू बाऴाला जन्म देताना होणारा रक्तस्त्रावामुळे होतो. प्रसूतीच्या दरम्यान भारतात जवळपास एक लाखांतील जवळपास १७४ महिलांचा मृत्यू या कारणामुळे झालाय.

नासाच्या एम्स रिसर्च सेंटर म्हणण्यानुसार, प्रसुती दरम्यान महिलांना या प्रकारचं स्पेस सूट घातला तर रक्तस्त्रावाचं प्रमाण काही प्रमाणात बंद होऊ शकतं. रक्तस्त्राव बंद झाला तर प्रत्येक वर्षी होणाऱ्या साडे तीन लाख महिलांचे प्राण वाचवू शकतो.

किंमत केवळ पाच रुपये... 

विश्व आरोग्य संघटनेनेही महिलांना हा सूट वापरण्याचा सल्ला दिलाय. या सूटचा वापर करायला २० देशांनी सुरुवात केली आहे. पाच रुपयांचा हा सूट जवळपास ७० वेळा वापरू शकतो. त्यामुळे प्रत्येक महिलेला प्रसुतीवेळी फक्त ७० रुपये मोजावे लागतात. सगळ्यात पहिल्यांदा हा सूट १९९० साली कॅलिफोर्नियाच्या एका कंपनीने बनवला होता.