मुंबई : वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी अनेक जण गोळ्या औषधं किंवा व्हायग्राचा आधार घेतात. पण आपल्याकडील आयुर्वेदीक गोष्टींच्या खजिन्यात डोकावलं असता पूर्वापार पासून आपल्याकडे अशा वस्तू आहेत ज्या नैसर्गिक व्हायग्राचे काम करतात.
अश्वगंधा : युरोलॉजी जनरलमध्ये प्रसिद्ध झाल्यानुसार जिनसेंग म्हणजे अश्वगंधा याचे आठ आठवडे सेवन केल्यास नैसर्गिक व्हायग्राचे काम करते. अश्वगंधातील हर्बल गुणधर्म हे एखाद्या व्हायग्रासारखे काम करते. दररोज ५ ते १० ग्रॅम पावडरच्या रुपात घ्यावे.
हिंग : चांगल्या आरोग्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा किंवा औषधींचा वापर करावा या संदर्भात डॉ. एच. के. बाकरू यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, ०.०६ ग्रॅम हिंग दररोज आपल्या आहारात ४० दिवस घेतले तर सेक्स पावर वाढते. तसेच शुक्राणूंची वाढ होते. तुम्ही जेवणात हिंगाचा वापर करू शकतात तसेच पाण्यासोबत हिंगाचा वापर करू शकतात. हे पाणी सकाळी सकाळी प्यायलास अधिक फायदा होऊ शकतो.
शेवगा : लैंगिक आजार असलेल्या व्यक्तीला शेवग्याच्या शेंगा खायला दिल्या तर त्याच्यात तो आजार दूर होतो आणि सेक्स करण्याची क्षमता वाढते. असे अमेरिकन जनरल न्युरोसायन्सने आपल्या अहवालात म्हटले आहे. आहारात तुम्ही शेवग्याच्या शेंगाचा वापर करू शकतात.
जिरे : मसाले केवळ तुम्हांला पदार्थांचा स्वाद वाढविण्याचे काम करीत नाही, तर तुमच्या सेक्स लाइफला अधिक स्पायसी बनवते. त्याच मसाल्यांपैकी एक आहे जिरे, जिऱ्यात झिंक आणि मिनिरल असते, ज्यामुळे शुक्राणूंची वाढ होण्यास मदत होते. हे पुरूषांमध्ये शीघ्रपतन, इरेक्टाइल डिसफंक्शन, संतानोत्पादक शक्तीच्या समस्यांचे निराकरण करते. रोज सकाळी अनेशापोटी जिऱ्याचा काढा करा. यासाठी एक कप उकळत्या पाण्यात अर्धा चमचा जिरे टाकून जिऱ्याचा काढा करू शकते. हा प्यायल्याने तुम्हांला लाभ होईल.
आले (अदरक) : आलं असा मसाला आहे ज्यामुळे लैंगिक जीवन सुधारण्यास मदत करते. पुरूषांमध्ये शीघ्रपतन आणि नपुंसकतेच्या समस्या दूर होण्यास मदत होती. रात्री झोपण्यापूर्वी हाफ बॉयल अंड्यात मध आणि छोटा चमचा आल्याचा रस टाकल्यास फायदा होता. सेक्स जीवनला स्पायसी बनविण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. हे खाल्ल्याने शरीरातील एन्डोरफीन बाहेर पडते. जे सेक्स जीवन सुधारण्यास मदत करते. रात्रीच्या जेवणावेळी आलं खाल्लं पाहिजे किंवा रात्री झोपण्यापूर्वी आल्याचा चहा प्यायला पाहिजे. आलं खाल्याने हृदयाचे ठोके वाढतात, रक्ताभिसरण वाढते त्यामुळे उत्तेजना वाढते.
लसूण : तज्ज्ञांनुसार लसूणात कामोत्तेजक गूण आहेत, रक्त संचार आणि सेक्सची क्षमता वाढण्यास मदत करते. लसूणमध्ये एलीकीन असते, ते प्रजनन अंगामध्ये रक्त प्रवाह वाढविण्यास मदत केले. कामेच्छा वाढविण्यासाठी लसूणच्या कॅप्सूलचा वापर केला पाहिजे. लसूणच्या दोन-तीन कळ्या कच्च्या खाल्यास सेक्स पॉवर वाढते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.