नैसर्गिक वातावरण देतं झोपेचा खरा आनंद!

एखाद्या पार्क किंवा समुद्र किनाऱ्यावर राहाणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे... एका नव्या शोधानुसार, अशा ठिकाणी राहणाऱ्यांना खास करून पुरुषांना खूप चांगली झोप येते. 

Updated: Aug 26, 2015, 05:23 PM IST
नैसर्गिक वातावरण देतं झोपेचा खरा आनंद! title=

न्यूयॉर्क : एखाद्या पार्क किंवा समुद्र किनाऱ्यावर राहाणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे... एका नव्या शोधानुसार, अशा ठिकाणी राहणाऱ्यांना खास करून पुरुषांना खूप चांगली झोप येते. 

अमेरिकेच्या इलिनोइस महाविद्यालयातील प्रोफेसर आणि शोधकर्ते डायना ग्रिग्सबे - टूसेंट यांच्या म्हणण्यानुसार, चांगल्या झोपेसाठी प्राकृतक वातावरण खूप महत्त्वाचं ठरतं, हेच या संशोधनातून सिद्ध होतंय. 

या संशोधनासाठी २,५५,१७१ लोकांचा अभ्यास करण्यात आला. पुरेशी झोप न मिळणं आणि हिरव्यागार जागेचा काही संबंध आहे किंवा नाही, याचा शोध घेण्यात आला. यावेळी, महिलांच्या तुलनेत पुरुषांची झोप आणि हिरवळ असलेली ठिकाणं यांच्यात संबंध दिसून आला. 

डायना यांच्या म्हणण्यानुसार, पुरुष आणि ६५ वर्ष किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या महिलांना चांगल्या झोपेचा आनंद देण्यात प्रकृती आणि नैसर्गिक वातावरण खूप महत्त्वाची भूमिका निभावतं... हा अभ्यास 'प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन' या जर्नलमध्ये प्रकाशित झालाय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.