मुंबई : संपूर्ण देशात स्वाईन फ्लूनं फैलावलाय. सध्याचं वातावरण स्वाईन फ्लू फैलावण्यासाठी पोषक ठरेल असंच आहे.
अपुऱ्या माहितीमुळे, गेल्या दोन वर्षांपासून भारतात दाखल झालेल्या या आजारासंबंधी अनेक समज-गैरसमज समाजात पसरताना दिसत आहेत.
त्यामुळेच, मग कधी मुंबईच्या महापौर स्वाईन फ्लू हा हृदयाचा रोग किंवा फुफ्फुसाचा आजार असल्याचं सांगतात तर कधीतरी 'कापूर, वेलची जाळा आणि स्वाईन फ्लू पळवा' असं अचानक मॅसेज तुमच्या मोबाईलवर येऊन धडकतो.
पण, स्वाईन फ्लूबद्दल तुम्हाला योग्य माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्वाईन फ्लूबद्ल आम्ही थेट जाणून घेतलंय 'बॉम्बे हॉस्पिटल'च्या डॉ. कपिल सालगिया यांच्याकडून....
प्रश्न : स्वाईन फ्लू टाळण्यासाठी लस उपलब्ध आहे का ?
उत्तर : होय, स्वाईन फ्लू टाळण्यासाठी लस उपलब्ध आहे. तापाची साथ सुरू झाल्यावर तात्काळ ही लस टोचून घेणं आवश्यक आहे. या लसीचा परिणाम होण्यासाठी २-३ आठवडे लागतात... या लसीमुळे स्वाईन फ्लूचा धोका ६० ते ७० टक्क्यांपर्यंत कमी होतो. स्वाईन फ्लूची लागण होण्याआधीच ही लस टोचून घेणं आवश्यक आहे.
प्रश्न : स्वाईन फ्लू टाळण्यासाठी बाजारात अनेक मास्क उपलब्ध आहेत, पण यापैकी नक्की कुठलं मास्क वापरावं ?
उत्तर : 'एन ९५' मास्क चांगली असल्याचं तज्ज्ञ सांगतात. स्वाईन फ्लूच्या पेशंटनी मास्क घालणं अत्यावश्यक आहे किंवा कुठल्याही मेडिकल दुकानांत मिळणारे मास्क तुम्ही वापरू शकाल. सर्जिकल मास्कही तुम्हाला या धोक्यापर्यंत वाचवू शकतात.
प्रश्न : स्वाईन फ्लू टाळण्यासाठी कापूर किंवा वेलची जाळा, अशा प्रकारचे मेसेजेस सध्या व्हॉटस अॅपवर फिरतायत, त्यामध्ये कितपत तथ्य आहे?
उत्तर : कापूर किंवा धूप जाळल्यानं स्वाईन फ्लू होत नाही, असे कुठलेही पुरावे नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.