नवी दिल्ली : पुरुषांना महिलांमधील कोणत्या गोष्टी आकर्षक आणि सेक्सी वाटतात? आतापर्यंत याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून याचे गुपित उघड झाले आहे.
संशोधनानुसार, पुरुषांना लांब केसांच्या महिला अधिक आकर्षक वाटतात. हेअरस्टाईल आणि वागणुकीसंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनातून ज्या महिलांचे केस लांब असतात अशा महिला पुरुषांना आकर्षक आणि सेक्सी वाटतात.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, लांब केसाच्या महिलांमध्ये प्रजनन क्षमता चांगली असते. संशोधनादरम्यान विविध हेअरस्टाईल करुन महिलांना पुरुषांसमोर आणण्यात आले यावेळी अनेक पुरुषांनी लांब केसांच्या महिलांना अधिक पसंती दिली. याअभ्यासाअंती लांब केसांच्या महिलांचे पुरुषांना अधिक आकर्षण असल्याचे स्पष्ट झाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.