रसरशीत आंबा आरोग्यासाठी खूप उपयुक्त

फळांचा राजा कोण तर... आंबा... सध्या बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळत असतात. माळदा, दशहरी, सफेदा अशा अनेक प्रकारचे आंबे असतात. 

Updated: Jun 29, 2014, 01:32 PM IST
रसरशीत आंबा आरोग्यासाठी खूप उपयुक्त title=

नवी दिल्ली : फळांचा राजा कोण तर... आंबा... सध्या बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळत असतात. माळदा, दशहरी, सफेदा अशा अनेक प्रकारचे आंबे असतात. 

आंबा हा खाण्यासाठी खूप रसदार असतो. मात्र तो फक्त खाण्यासाठी नव्हे तर तो आपल्या आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे.
आंबा तयार होताना तो सफेद रंगातून पिवसळर होतो. त्याच पिवळसर रंगाच्या आंब्यात असलेले कॅरोटीन आपल्या शरीरात जाऊन विटामिन 'ए'मध्ये रुपांतरित करतात. त्याचबरोबर त्यात विटामिन 'सी' ही खूप प्रमाणात असतात. 

आंब्याच्या अनेक प्रकारच्या जाती असतात. त्या जातीमध्ये वेगवेगळे रंग, आकार, त्यांची वेगवेगळी चवही असते. देशी आंबे जे चोखून खातात त्याची साल पातळ असते आणि त्यात भरपूर फायबर असतात. कलमी आंब्यामध्ये फायबर कमी असते त्या आंब्याला कापून खाल्ले जाते. 

वैद्यकिय दृष्टीकोनातून देशी आंबे हे जास्त गुणकारी मानले जातात. पिकलेला आंबा हा रक्तवर्दक, गोड, प्रमेहनाशक, वातनाशक, ओटीपोट गुणकारी, तृप्तिकारक, यकृतसाठी खूप शक्तीशाली आहे. 

आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन 'ए' असल्याने डोळ्यांच्या प्रकाश वाढविण्यासाठी आणि रात्र अंधत्व घालवण्याकरिता आंब्याचा उपयोग होतो. त्यात सायट्रिक अॅसिड, टरटॅरिक अॅसिड आणि तंदूरुस्त शरीर आणि शरीरातील मूलभुत घटकांना संतुलन बनवतो. 

आंब्यातील विटामिन 'ई'चा चांगला स्त्रोत असल्यामुळं कामवासना वाढवता येते. खूप संशोधनाने या गोष्टीला मानले गेल्या आहेत. 
आंब्यात फायबर आणि विटामिन 'सी' चांगल्या प्रमाणात असतात. ज्याने डेंसिटी लिपोप्रोटीन(एमलीएल) म्हणजेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.