सावधान: मुलांना गाडीच्या सीटवर झोपवणं धोकादायक

मुलांना गाडीच्या सीटवर झोपवणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं. एका संशोधनात असं लक्षात आलं आहे. मुलांना गाडीच्या सीटवर अथवा कोणत्याही बसण्याच्या वस्तूवर झोपवल्यास त्यांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. 

Updated: Apr 25, 2015, 01:24 PM IST
सावधान: मुलांना गाडीच्या सीटवर झोपवणं धोकादायक title=

न्यू यॉर्क: मुलांना गाडीच्या सीटवर झोपवणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं. एका संशोधनात असं लक्षात आलं आहे. मुलांना गाडीच्या सीटवर अथवा कोणत्याही बसण्याच्या वस्तूवर झोपवल्यास त्यांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. 

संशोधकांनी केलेल्या संशोधनात ४७ अशी प्रकरणं समोर आली ज्यामध्ये दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा मृत्यू अशा बसण्याच्या वस्तूंवर झोपल्यामुळं झाला आहे. या प्रकरणांमध्ये दोन तृतीयांश प्रकरणात गाडीच्या सीटचा समावेश आहे. अन्य प्रकरणात झोके, स्टुलर आणि लहान मुलांना ठेवण्याच्या उपकरणांचा समावेश आहे. संशोधनात असं आढळून आलं की लहान मुलं बऱ्याच वेळा या बसण्याच्या वस्तूंवर झोपून जातात. 

संशोधन केलेल्या डॉ. एरिच बत्रा यांनी सांगितलं की, अनेक पालक आपल्या मुलांना बसण्याच्या वस्तूंवर झोपवतात, पण त्यांना हे कळत नाही की असं केल्यानं आपल्या मुलाच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.