www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘आयला... पुन्हा विसरलो बघ!’ असं दिवसातून तुम्हाला अनेकवेळा म्हणावं लागत असेल तर ‘दिमाग मे कुछ लोचा है बॉस’ असं तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला ऐकायला मिळतच असेल... खरं म्हणजे हा ‘लोचा’ वगैरे काही नसतो. ही तुम्ही स्वत:ला लावून घेतलेली सवय असते... विसरायची... लक्षात ठेवणार नाही तर विसरणारच ना!
पण, लक्षात ठेवायचं कसं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या काही साध्या-सोप्या टीप्स तुमच्यासाठी...
जेव्हाही तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटाल तेव्हा त्याचं नाव आणि चेहरा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचं नाव दोन-तीन वेळा मनात घोळवा. त्याला संबोधताना त्याच्या नावाचाच वापर करा. अशा पद्धतीनं लोकांची नावं विसरण्याची तुमची समस्या दूर होऊ शकेल.
चिंताग्रस्त असताना एखादी गोष्ट सहज विसरणं, ही खूप सामान्य बाब आहे. पण, याचा अर्थ हा नव्हे की तुमची बुद्धी कमजोर पडलीय. त्याचं कारण म्हणजे तुमची एकाग्रता... एकाग्रतेच्या अभावामुळे तुम्हाला विसरण्याची सवय लागू शकते. एकाग्रता वाढवण्याची प्रयत्न करा.
शरीराला व्यायामाद्वारे थोडा ताण दिल्याशिवाय धमन्यांमधला रक्तसंचार कसा सुधारणार? त्यामुळे मेंदूला रक्ताच्या साहाय्यानं आलेल्या ऑक्सिजन आणि पोषक तत्वांनी ऊर्जा मिळते. जेव्हा हे पोषक तत्व मेंदूपर्यंत पोहचण्यास अकार्यक्षम ठरतात तेव्हा मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो.
एखाद्या गोष्टीला पाहणं शक्य नसेल तर अशा गोष्टींचा विचार करताना व्हिज्युअलायझेशन करण्याचा प्रयत्न करा. त्याची प्रतिमा मनात तयार करा. त्यामुळे वस्तू तुमच्या लक्षात राहण्यास फायदेशीर ठरेल.
लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीवर केवळ आठ सेकंद ध्यान केंद्रीत केलं तर ती गोष्ट तुमच्या नेहमीसाठी लक्षात राहू शकते.
जर तुम्हाला कुणाचा मोबाईल नंबर किंवा पिनकोड लक्षात ठेवण्यास कष्ट पडत असतील तर त्यांना तुकड्यांमध्ये विभाजन करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.