मुंबई : स्वच्छ राहण्यासाठी रोज आंघोळ करणे गरजेचे असते मात्र तुम्हाला माहीत आहे का रोज आंघोळ करण्याची सवय आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
तुम्हाला हे ऐकून नक्कीच धक्का बसेल. मात्र ब्रिटनच्या 'द सन' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार रोज आंघोळ करण्याची सवय अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरु शकते.
आंघोळीमुळे शरीरावरील तेल निघून जाते. मात्र हे तेल शरीरासाठी आवश्यक असते. पश्चिमेकडील लोकांसाठी ही सवय अधिक हानिकारक ठरु शकते. तेथे आंघोळीच्या आधी तेल लावण्याची पद्धत नाही. तसेच बॉडी ऑईलही फार कमी प्रमाणात वापरले जाते. अशावेळी रोज आंघोळ केल्यास शरीराला आवश्यक असेलले तेल निघून जाते. यामुळे त्वचेला नुकसान पोहोचते.
ऑस्ट्रेलियन कॉलेजच्या डर्मोटोलॉजीचे अध्यक्ष प्रोफेसर स्टीफन शुमैक यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा आंघोळ करण्याची गरज आहे असं वाटेल तेव्हाच आंघोळ करावी. त्वचेतून विशिष्ट प्रकारचा तैलीय द्रव पदार्थ उर्त्सजित होत असतो. या पदार्थामुळे त्वचेवर संरक्षण थर निर्माण होतो. रोज आंघोळ केल्याने हा तैलीय पदार्थ निघून जातो. यामुळे त्वचेसंबंधी आजारांचे प्रमाण वाढते.