मेकअप उतरवण्यासाठी बदामाचे तेल सर्वोत्तम

मुंबई : मेकअप करताना तो करण्याची जशी एक पद्धत असते, तसाच तो मेकअप उतरवण्यचीही एक पद्धत असते. 

Updated: Apr 6, 2016, 04:39 PM IST
मेकअप उतरवण्यासाठी बदामाचे तेल सर्वोत्तम title=

मुंबई : मेकअप करताना तो करण्याची जशी एक पद्धत असते, तसाच तो मेकअप उतरवण्यचीही एक पद्धत असते. आपल्या चेहऱ्यावरील त्वचा खूप संवेदनशील असते. त्यामुळे मेकअप करताना जशी काळजी घ्यावी लागते तशीच ती मेकअप उतरवतानाही घ्यावी लागते. हे करण्यासाठी बदामाचं तेल हा चांगला पर्याय ठरू शकतो. बदामाच्या तेलात असे अनेक पोषक गुण असतात जे त्वचेसाठी आवश्यक असतात.

बदामात असलेले काही घटक हे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचा बचाव करतात. तसेच चेहऱ्यावर वाढत्या वयाचे लक्षण असणाऱ्या सुरकुत्याही कमी करतात. म्हणूनच मेकअप  काढताना बदामाचे तेल लावणे फायदेशीर ठरते.

बदामाचे तेल लावताना त्यात कोणत्याही प्रकारच्या केमिकल मध्ये असणाऱ्या घटकांच्या धोक्याप्रमाणे धोका नसतो. बदामाचे तेल पूर्णपणे नैसर्गिक असते. म्हणूनच बदामाचे तेल हे बाजारातील कोणत्याही लोशनला चांगला पर्याय ठरू शकते.

मेकअप केल्याने चेहऱ्यातील पाण्याचा अंश निघून जातो आणि चेहरा कोरडा होतो. पाण्याचा हाच अंश टिकवून त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्याचं काम बदामाचं तेल करतं.

कसा वापर कराल?
बदामाच्या तेलाने मेकअप काढून टाकणं अगदी सोपं आहे. तुमच्या हातात बदामाचे तेल घेऊन त्याने तुमच्या चेहऱ्याचा अगदी चांगल्या पद्धतीने मसाज करा. तुमच्या डोळ्यांच्या भवतालीही हळूवार मसाज करा. त्यानंतर कापसाचे तुकडे गुलाब पाण्यात बुडवून चेहरा स्वच्छ करुन घ्या. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या.