मुंबई : बहुतेक भारतीयांना उच्च रक्तदाबाचा त्रास आढळून येतोय... अनेकांचा मृत्यूही याच कारणामुळे झालाय.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीच्या दररोजच्या आहारात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचा समावेश असू नये... अन्यथा अशा व्यक्तींना उच्च रक्तदाबाची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.
दररोजचा आहार घेताना याकडे लक्ष द्या...
- लोणची, पापड, सॉस, केचअप, अजिनोमोटो, खारवलेले पदार्थ, शेव चिवडा अशा खाऱ्या पदार्थांतून मोठ्या प्रमाणात मीठ पोटात जातं.
- आहारात मिठाचं प्रमाण मोठ्य़ा प्रमाणात असेल तर अन्न पचनाची प्रक्रिया बिघडण्याची शक्यता असते.
- जठराचा कर्करोग, कॅन्सर अशा आजारांची शक्यता बळावते
- जेवणातही शिजवतानाच मीठ टाकावं... वरतून मीठ घेणं टाळावं