मुंबई: मॅनोपॉज (मासिक पाळी बंद होणं) ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ज्यापासून दूर पळता येत नाही. मात्र त्याच्याशी निगडित आजारांपासून बचाव करत आपण आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकता. अशात हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी खूप उपयुक्त ठरते.
या थेरपीचा मुख्य उद्देश म्हणजे मॅनोपॉजनंतर शरीरात हार्मोनची कमतरता औषधांद्वारे पूर्ण केली जाते. मॅनोपॉज आल्याच्या एक ते दोन वर्षांनंतर संपूर्ण शरीराची तपासणी करणं आवश्यक आहे. नाहीतर भविष्यात हॉट फ्लॅश, मानसिक नैराश्य, स्मृती कमी होणे, वारंवार लघवीत संक्रमण आणि संबंध ठेवण्यात अनिच्छा सारख्या समस्या उपलब्ध होतील. याशिवाय मधुमेह, हार्ट अॅटॅक, ऑस्टियोपोरोसिस, ऑर्थराइटिस आणि महिला जननेंद्रियांचा कॅन्सर पण होऊ शकतो.
मॅनोपॉजनंतर जेव्हा शरीरात एस्ट्रोजन हार्मोनची कमतरता होते तेव्हा महिलेच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थावर परिणाम होतो. हीच कमतरता औषधांद्वारे नियंत्रित करता येऊ शकते. हा उपचार तज्ज्ञांच्या सल्लानुसार त्यांच्या देखरेखीखाली केला जातो.
हार्मोन थेरपी महिलांमध्ये वयवर्ष ४७ नंतर किंवा मॅनोपॉजच्या एक ते दोन वर्षांनंतर करणं गरजेचं आहे कारण त्यानंतर शरीरात एस्ट्रोजन हार्मोनची कमतरता होऊ लागते. जर आपलं वय ६० वर्षांहून कमी आहे किंवा मॅनोपॉजचे १० वर्ष संपले आहेत तर हार्मोन थेरपीचा उपयोग जास्त होतो आणि धोका कमी असतो.
मासिक पाळी बंद होण्याच्या काळात हाडांची झिज थांबविण्यासाठी हार्मोन थेरपी उपयुक्त ठरलीय. मेंदूशी निगडित व्यायाम, सकारात्मक विचार, मनोरंजन आणि सामाजिक उपक्रम, नियमित अॅरोबिक व्यायाम केल्यानं मानसिक स्वास्थ चांगलं राहू शकतं. हार्मोन थेरपीच्या प्रयोगानं डायबिटीजचीही भीती कमी होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.