मुंबई : थंडीच्या दिवसांत किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला त्वचेचा तजेलदारपणा कमी झाल्याचं आढळलं असेल. उन्हाळ्यात कोरड्या हवामानामुळे ही समस्या जास्त जाणवते. तसंच थंडीतही त्वचा शुष्क होते.
यासाठी बाजारात अनेक स्क्रब उपलब्ध असतात पण, तुम्ही घरच्या घरीही स्क्रब बनवू शकता... तेही अगदी सोप्या पद्धतीनं आणि सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून...
- एक कब तांदूळ चार - पाच तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा
- त्यानंतर त्याला मिक्सरला लावून बारीक वाटून घ्या
- यामध्ये अर्धा कप दही मिसळून दोघांना मिक्स करून घ्या
- यामध्ये, हवं तर ३-४ थेंब लेवेंडर ऑईलही तुम्ही मिक्स करू शकता.
आणि झालं तुमचं स्क्रब तयार... हे स्क्रब तुम्ही आंघोळ करताना संपूर्ण शरीरावर वापरू शकता. तांदळाच्या दाण्यांमुळे त्वचेवरील डेड स्कीन निघून जाते तर दह्यामुळे त्वचेचा तजेलदारपणा पुन्हा मिळण्यासाठी मदत होते.