खडीसाखर खाण्याचे हे आहेत फायदे

साखरेचे क्रिस्टल रुपातील खडे म्हणजे खडीसाखर. खडीसाखरेत केवळ पदार्थात गोडवा आणण्याचा गुणधर्मच नाहीये तर अनेक त्याचे अनेक औषधी फायदेही आहेत. मंदिरामध्ये प्रसादाच्या रुपातही खडीसाखर वाटली जाते. 

Updated: Feb 23, 2016, 11:44 AM IST
खडीसाखर खाण्याचे हे आहेत फायदे title=

मुंबई : साखरेचे क्रिस्टल रुपातील खडे म्हणजे खडीसाखर. खडीसाखरेत केवळ पदार्थात गोडवा आणण्याचा गुणधर्मच नाहीये तर अनेक त्याचे अनेक औषधी फायदेही आहेत. मंदिरामध्ये प्रसादाच्या रुपातही खडीसाखर वाटली जाते. 

मुखवासासाठी बडिशेपसोबत खडीसाखर दिली जाते.

खडीसाखरेचे पाणीही शरीरासाठी उत्तम असते. उन्हाळयाच्या दिवसात खडीसाखर टाकलेले पाणी प्यायल्यास शरीराला एनर्जी मिळते. 

कोरडा खोकल्या झाल्यास खडीसाखर चघळण्यास द्यावी. याने नक्की फायदा होतो. तसेच घश्याला आरामही मिळतो. 

साखरेपेक्षा खडीसाखर नेहमी चांगली. सर्दीमुळे नाक वाहत असेल अथवा घशात खवखव जाणवत असेल तर खडीसाखरेचे पाणी प्यावे.