रजोनिवृत्तीच्या काळात महिलांचा आहार कसा असावा?

सर्वच स्त्रियांना उतरत्या वयाच्या काळात रजोनिवृत्तीच्या नैसर्गिक प्रक्रियेमधून जावेच लागते. कधी कधी हा काळ काही वर्षापर्यंत लांबू शकतो तर काहींसाठी तो एकदम संपतो. काही जणींना त्याचा काहीच त्रास होत नाही तर काहींना रात्री खूप घाम येणे, मूडी होणे अशी त्रासाची लक्षणं दिसायला लागतात. पण, तुमचा आहार योग्य असेल तर याचा फारसा त्रास जाणवणार नाही. 

Updated: Jul 7, 2016, 08:09 AM IST
रजोनिवृत्तीच्या काळात महिलांचा आहार कसा असावा? title=

मुंबई : सर्वच स्त्रियांना उतरत्या वयाच्या काळात रजोनिवृत्तीच्या नैसर्गिक प्रक्रियेमधून जावेच लागते. कधी कधी हा काळ काही वर्षापर्यंत लांबू शकतो तर काहींसाठी तो एकदम संपतो. काही जणींना त्याचा काहीच त्रास होत नाही तर काहींना रात्री खूप घाम येणे, मूडी होणे अशी त्रासाची लक्षणं दिसायला लागतात. पण, तुमचा आहार योग्य असेल तर याचा फारसा त्रास जाणवणार नाही. 

जेवणात सोयाचा वापर

सोयामध्ये फायटो एस्ट्रोजन किंवा प्लॅन्ट एस्ट्रोजन असते. यामुळे रात्री घाम येणं, मूड बदलणं, हॉट फ्लशेस या समस्या कमी होतात. रक्तातील कॅलोस्ट्रॉल कमी ठेवायला मदत होते, त्यामुळे हृदयाचे विकार कमी होतात, व हाडांमध्यल्या धातुंची घनता वाढते, ज्यानुळे ऑस्टोपोरोसिस या रोगापासून संरक्षण मिळते

कॅल्शियमचं प्रमाण वाढवा 

यामुळे, हाडं मजबूत होतात. मेनोपॉजनंतर कंबरेच्या हाडांना इजा व्हायची शक्यता असते, ती शक्यता कॅल्शियम वाढवल्यामुळे कमी होते.  

फोलेट वाढवा

दिवसाला ४०० मायक्रो ग्रॅम विटामिन बी फ्लोएट घेतल्यानं हृदयाचे रोगाची भीती कमी होते. 

वजन योग्य प्रमाणात ठेवा

वजन कमी ठेवले की हृदयाचे रोग होण्याची शक्यता कमी होते. मेनोपॉजनंतरही हा त्रास होण्याची शक्यता कमी होते.

बोरोन व फायबर्स असलेलं अन्न घ्या 

बोरॉनमुळे शरीरातले एस्ट्रोजन कायम राहते, जे मेनोपॉजच्या वेळेस कमी होण्याची शक्यता असते. फायबरनी कोलेस्ट्रोल कमी होते. दिवसाला २०-३० ग्रॅम फायबर शरीरासाठी पुरेसं ठरतं. सफरचंद, बीन्स‌, कोबी, स्ट्रॉबेरी, टोमॅटो यांतून फायबर व बोरॉन मिळतं.