मुंबई : शरीरात कॅल्शियमची कमी असल्यामुळे हाडांना मजबुती मिळत नाही. धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकाला योग्य आहार घेण्यासाठी वेळ नसतो. आहार घेताना नेहमी कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा. त्यामुळे कमी वयात हाडांना मजबुती मिळते.
रोजच्या आहारात या 6 गोष्टींचा समावेश करा.
1. पालेभाज्या : रोज आहारात एकदातरी पालेभाजी खावी त्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते.
2. दूध : दूधात कॅल्शियम जास्त असल्यामुळे रोज एक ग्लास दूध प्यावे.
3. दही : रोजच्या आहारात एक वाटी दहीचा समावेश करावा त्यातून शरीराला 450 मिग्रा कॅल्शियम मिळते.
4. लिंबू : दिवसातून एकदा तरी लिंबूपाणी प्यावे त्याने शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी होत नाही.
5. गाजर: गाजरमध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे रोजच्या आहारात गाजर खाणे गरजेचे आहे.
6. गूळ : रोजच्या आहारात थोडा गूळ खाल्ल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात फास्फोरस आणि कॅल्शियम मिळेल.