रिकाम्या पोटी हे पदार्थ खाऊ नका

प्रत्येक वस्तू खाण्याची एक वेळ असते. मात्र काही गोष्टी रिकाम्या पोटी खाणे चांगले नसते. आम्ल पदार्थ रिकाम्या पोटी कधीही खाऊ नये. यामुळे पोटावर त्याचा परिणाम होतो. खालील गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नयेत.

Updated: Dec 13, 2015, 03:24 PM IST
रिकाम्या पोटी हे पदार्थ खाऊ नका title=

नवी दिल्ली : प्रत्येक वस्तू खाण्याची एक वेळ असते. मात्र काही गोष्टी रिकाम्या पोटी खाणे चांगले नसते. आम्ल पदार्थ रिकाम्या पोटी कधीही खाऊ नये. यामुळे पोटावर त्याचा परिणाम होतो. खालील गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नयेत.

सोडा : सोडामध्ये उच्च प्रमाणात कॉर्बोनेट अॅसिड असते. यामुळे रिकाम्या पोटी सोडा घेतल्यास पोटातील आम्लासह याचे मिश्रण होऊन पोटदुखीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

टोमॅटो : कच्चे टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे असतात. मात्र रिकाम्या पोटी हे नुकसानदायक असते. रिकाम्या पोटी टोमॅटो खाल्ल्याने मुतखड्याचा त्रासही होऊ शकतो. 

औषधे : डॉक्टर नेहमी सांगतात की रिकाम्या पोटी औषधे घेऊ नका. यामुळे शरीराचे संतुलन बिघडू शकते.

अल्कोहोल : काही लोकांना रिकाम्या पोटी अल्कोहोल घेणे आवडते. मात्र हे शरीरासाठी चांगले नाही

अधिक मसालेदार खाणे : अनेकांना चटपटीत, मसालेदार खाणे पसंत असते. मात्र रिकाम्या पोटी असे पदार्थ कधीच खाऊ नयेत. 

कॉफी : रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन करणे शरीराला नुकसान पोहोचवणारे ठरते. कॉफीतील कॅफेन पोटासाठी चांगले नसते. सकाळी उठल्यावर तुम्ही कॉफी पित असाल तर त्यापूर्वी एक ग्लास पाणी नक्की प्या

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.