जीवनात या ५ चुका कधीच करू नका

माणूस हा अनेकदा नकळत अनेक चुका करत असतो.

Updated: Jan 20, 2016, 06:00 PM IST
जीवनात या ५ चुका कधीच करू नका title=

मुंबई : माणूस हा अनेकदा नकळत अनेक चुका करत असतो. काही वेळेस आपण अनेक चुका टाळू शकतो. पण त्यासाठी आपल्याला फक्त थोडं जागृत असण्याची गरज असते. पार्टनरसोबत असतांना आपण अनेक चुका करतो. त्यामुळे अनेकांचे संबंध खराब होतात.

आम्ही तुम्हाला अशा ५ गोष्टी सांगणार आहोत ज्या होऊ नये यासाठी तुम्ही जागृत असले पाहिजे. त्या कोणत्या चुका आहेत ज्या नाही करायच्या हे तुम्हाला माहित पडलं तर तुम्ही जगातील सर्वात चांगले पार्टनर बनू शकता.

या ५ चुका कधीच करू नका :

१. अपशब्द : रिलेशनशिपमध्ये आहात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला कोणताही अपशब्द वापरायचा नाही आहे. दोघांमध्ये रिस्पेकट असला पाहिजे.

२. जबरदस्तीचा संबंध : तुमच्या पार्टनरला शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करू नका. कारण पुढे जाऊन याचा परिणाम तुमच्या रिलेशनवर होणार आहे. पार्टनरची इच्छेविरोधात कोणतीही गोष्ट करणे हे संबंधावर परिणाम करणारं असतं यामुळे संबंध तुटतात.

३. दोषी ठरवणे : काहीही चूक झाली तरी याला तूच जबाबदार आहे असं तुमच्या पार्टनरला कधीच बोलू नका. शांतपणे बसून चूक झाली असेल तर ती समजून घ्या कारण काही वेळेस परिस्थिती चुकांना जबाबदार असते. त्यामुळे दोघांनीही एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे.

४. तुलना करणे : रिलेशनशिपमध्ये संबंध तुटतात त्याला बऱ्याचदा कारण असतं तुलना करणे. कोणत्याही गोष्टीत पार्टनरती तुलना कोणत्याही इतर व्यक्तीशी करू नका. तुलना केल्याने समोरच्या व्यरक्तीच्या मनात तुमच्याविषयी राग निर्माण होतो. 

५. जुन्या गोष्टींवरून दोष : तुमच्या पार्टनरकडून भूतकाळात जर कधी काही चूक झाली असेल तर ती भविष्यात परत कधीच बोलून दाखवू नका. कोणतीही चूक झाल्यास ती मागच्या गोष्टीवरून टोमणे मारणे बंद केले पाहिजे.