मुंबई : भारतातील सुमारे 90 टक्के लोकांची दिवसाची सुरुवात चहाने होते. सकाळी उठल्यानंतर गरमगरम वाफाळता चहा घेतला की प्रसन्न वाटते. मात्र सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा पिण्याने प्रसन्न वाटत असले तरी त्याचे तोटे मात्र बरेच आहेत.
रिसर्चनुसार सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने नुकसान होते खासकरुन उन्हाळ्यात. चहामध्ये कॅफेन आणि टॅनिन असते ज्यामुळे शरीरास उर्जा मिळते. मात्र काळ्या चहामध्ये दूध टाकल्यास त्यातील अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात.
चहामध्ये आम्लीय गुण असतात. ज्यामुळे रिकाम्या पोटी चहा घेतल्यास पाचनशक्तीवर परिणाम होतो.
रिसर्चनुसार ज्या व्यक्ती रिकाम्या पोटी दुधाचा चहा घेतात त्यांना अधिक थकवा जाणवतो. कारण चहामध्ये दूध घातल्यानंतर त्यातील अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात.
काहींना कडक चहा घेण्याची सवय असते. रिकाम्या पोटी असा चहा घेतल्यास अॅसिडीटी होण्याची शक्यता असते.
रिकाम्या पोटी केवळ चहा न घेता चहासोबत बिस्कीट अथवा अन्य काही खावे.