मोबाईल आणि लॅपटॉप वापरुन डोळे खराब होत असल्यास हे करा

मुंबई : आजकाल कॉम्प्युटर, लॅपटॉप शिवाय काम करणं हे अशक्य आहे. 

Updated: Jan 20, 2016, 07:09 PM IST
मोबाईल आणि लॅपटॉप वापरुन डोळे खराब होत असल्यास हे करा title=

मुंबई : आजकाल कॉम्प्युटर, लॅपटॉप शिवाय काम करणं हे अशक्य आहे. ऑफिस असो की घर, प्रत्येक जण संगणक वापरतो. इतकंच काय, तर त्यानंतर सर्वच आपला मोबाईलही वापरतात. 

कायम एखाद्या स्क्रीनकडे बघत राहिल्याने दृष्टी कमजोर होऊ शकते. पण स्क्रीनपासून दूर राहू शकत नाही. यामुळे नजर चांगली ठेवण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी बदलू शकता. खालील गोष्टींचा तुमच्या खाण्यात भरपूर समावेश करा. 



१. हिरव्या भाज्या - हिरव्या पालेभाज्या खाणे कधीही फायदेशीर ठरू शकते कोबी, पालक यांसारख्या भाज्यांत ल्युटीन आणि जीनेनथीन असल्याने ही सत्व मोतीबिंदूवर मात करण्यासाठी चांगली ठरू शकतात. याशिवाय वाटाणे आणि ब्रोकोलीचा समावेशही आपल्या खाण्यात करत जा. 





२. ड्रायफ्रूट्स - पिस्ता, अक्रोड, बदाम यांसारख्या सुक्या मेव्यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतं. यात व्हिटॅमीन ई चा ही भरपूर समावेश असतो. 



३. फळे - लिंबू, संत्रे यांसारख्या आंबट फळांतील क जीवनसत्व मोतीबिंदू सारख्या विकारांना दूर ठेवू शकतं.



४. मासे - मासे खाणे डोळ्यांसाठी उत्तम आहे. यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड डोळ्यांतील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवते आणि डोळे सुकू देत नाही. 



५. अंडी - अंड्यात अ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं जे नजरेची क्षमता वाढवतं. त्यामुळे रातांधळेपणासारख्या समस्यांवर ते फार परिणामकारक ठरू शकतं.