खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी

आज अंडे हे अनेकांच्या जेवनातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. अनेक लोक अंडे हे नियमित खातात. त्यासाठी रोज दुकानात जाऊन ते खरेदी करु पडे नये त्यासाठी आपण ते घरात आणून फ्रिजमध्ये ठेवतो. पण जर तुम्ही असं करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं.

Updated: Jan 31, 2016, 08:26 PM IST
खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी  title=

नवी दिल्ली : आज अंडे हे अनेकांच्या जेवनातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. अनेक लोक अंडे हे नियमित खातात. त्यासाठी रोज दुकानात जाऊन ते खरेदी करु पडे नये त्यासाठी आपण ते घरात आणून फ्रिजमध्ये ठेवतो. पण जर तुम्ही असं करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं.

फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी नंतर तुम्ही खाण्यात वापरत असाल तर त्याचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. आपल्याला वाटतं की फ्रिजमध्ये ठेवलेले अंडी ही ताजी राहतात. पण वैज्ञानिकांच्या मते आपला हा विचार चुकीचा ठरवला आहे.

फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी ही जास्त काळ चांगली राहतात. अशी आपली समजूत आहे. पण वैज्ञानिकांच्या मते घरातील सामान्य तापमानातील अंडी ही  फ्रिजमधली अंडींपेक्षा जास्त काळ चांगली राहतात.

फ्रिजमधील अंडी जास्त थंड झाल्याने त्यातील पोषक द्रव्ये निघून जातात आणि त्याचा आपल्या शरिराला काहीच फायदा होत नाही. 

केक बनवतांना फ्रिजमधील अंडी टाकू नये त्यामुळे केक एकजीव होत नाही. 

फ्रिजमधील अंडी ही खाण्यासाठी ही चविष्ट लागत नाही. कारण ती बाशी होतात. त्यामुळे नेहमी फ्रेश अंडी खावीत. 

रूममधील सामान्य तापमानात अंडी 7 ते 10 दिवस चांगली राहू शकतात. फ्रिजमधील अंडी ही 30 ते 40 दिवस चांगली राहतात पण त्याच्यातील ताजेपणा, स्वाद आणि  पोषत द्रव्य निघून जातात. त्यामुळे ती खाऊनही शरिराला त्याचा काही उपयोग होत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.