मुंबई : लग्नानंतर स्त्रिया काही गोष्टी ह्या आपल्या पती पासून लपवतात. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या पती-पत्नीमधील संबंध पारदर्शक, विश्वासू आणि मजबूत ठेवण्यासाठी लपवून नाही ठेवल्या पाहिजे.
तारुण्याशी निगडीत अशा अनेक गोष्टी असतात ज्याच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला ५ गोष्टी सांगत आहोत ज्या नवऱ्यापासून नाही लपवल्या पाहिजे.
पूर्वीचं प्रेम प्रकरण : पतीला आपल्या पूर्वीच्या प्रेम प्रकरणाबाबत सांगितलं पाहिजे. कारण नंतर जर ही गोष्ट तुमच्या वैवाहिक जीवनात अचानकपणे आली तर ती तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम करू शकते. त्यामुळे तुमच्या पतीला पूर्वीचे संबंध सांगून विश्वासात घेतलं पाहिजे. कारण त्यानंतर पती तुमच्या सोबत उभा राहील.
शारीरिक संबंध : तुमच्या पतीला तुमच्या मागील जीवनाबाबत जाणून घेण्याचा हक्क आहे. तुमच्या हातून घडलेली चूक तुम्ही सांगितली पाहिजे. तुम्ही विश्वासपूर्वक सांगितलेली ही गोष्ट दोघांमध्ये एक आत्मीय आणि मजबूत संबंध तयार करेल. त्यामुळे एकमेकांवर विश्वास निर्माण होईल.
असुरक्षेची भावना : जर तुमच्या मनात ही गोष्ट सतत येत असेल की दुसरी कोणती महिला तुमच्या पतीला तुमच्यापासून दूर करेल तर ही गोष्ट तुमच्या पतीला नक्की सांगा. कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा विचार करू नका. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात कटुता येऊ शकते.
कमतरता : जर तुमच्यात कोणत्याही गोष्टची कमतरता आहे. तर गोष्ट पतीला नक्की सांगा. त्यामुळे पती तुमच्यातील कमतरता दूर करण्यासाठी तुम्हाला मदत करेल.
जवळचा पुरूष मित्र : तुम्ही तुमच्या सर्व पुरूष मित्रांबाबत तुमच्या पतीला सांगितलं पाहिजे. असं केल्यास तुमचा पती व्यर्थ अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करेल.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.