योगा असाध्य व्याधींवर रामबाण उपाय

Updated: Jun 10, 2015, 12:03 PM IST
योगा असाध्य व्याधींवर रामबाण उपाय title=
लखनऊ : योगाच्या माध्यमातून आरोग्य सुधारण्यास वेळ लागत असला तरी याने असाध्य व्याधीही कायमच्या दूर होतात. बदलत्या जीवनशैलीमुळे आज अनेक आजार आपल्यापुढे आवासून उभे आहेत. परंतु अशा सर्व आजारांवर योगाच्या माध्यमातून मात करता येते.
 
योगामध्ये अशी अनेक आसन आहेत ज्यांच्या उपयोगाने कोणताही आजार आपल्याजवळ फिरकणार नाही. आसनांचा प्रभाव इतका असतो की, औषधांची गरजही राहत नाही, असे योग तज्ज्ञ मीना सोंधी यांनी सांगितले.

कोणती कराल आसने?

सूक्ष्म आसन
चाळीशीनंतर आहारात आलेल्या अनियमिततेमुळे महिलांना कॅल्शिअमची  कमतरता जाणवते. त्यामुळे गुडघेदुखी व स्पॉन्डीलायटीस सारखे आजार त्रास देऊ लागतात. अशावेळी हे आसन केल्याने त्याचा फायदा होतो.

भद्रासन
महिलांना गर्भाशयासंबंधी समस्या आणि स्नायूंवर ताण येत असेल तर हे आसन नियमितपणे केल्याने आराम मिळतो.

कपालभाती
या आसनाने फुफ्फुस आणि मज्जासंस्थेचे आरोग्य  चांगले राखता येते.

अनुलोम-विलोम
याने श्वसनसंस्थेचे विकार, रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रीत करता येते.

भ्रामरी  प्राणायाम
मानसिक ताण, काळजी आणि नैराश्य या आसनाने दूर करता येतात.

शितली प्राणायाम
ऊन्हाळ्याच्या दिवसात शितली प्राणायाम केल्याने आम्लपित्त तसेच पोटाचे विकार आटोक्यात आणता येतात. या आसनाने वयस्क लोकांना फार आराम मिळतो.

सूर्य नमस्कार
सूर्य नमस्कार मुलांच्या विकासावर खूप परिणाम करतो. मुलांची उंची आणि दृष्टी सुधारण्यास सूर्य नमस्कार उपयोगी ठरतो.

सर्वांगासन
युवावर्गामध्ये विविध कारणांनी येणारे नैराश्य या आसनाच्या मदतीने कमी करता येते

चक्रासन
चक्रासन केल्याने एकाग्रतेत वाढ होते. तसेच हृदयासाठीही हे आसन उपयोगी आहे.

हलासन
शारिरीक तसेच मानसिक थकवा घालविण्यात हे आसन उपयोगी ठरते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.