मुंबई : सध्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची हेळसांड करीत असतो. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. आज कोलोस्ट्रॉलची समस्या भेडसावत आहे. मात्र, तुम्ही घरगुती उपाय करून तुमचे कोलोस्ट्रॉल कमी करु शकता किंवा त्यावर नियंत्रण मिळवू शकता.
आपल्या आहारात ओटचे जाडे भरडे एक वाटी पीठ असावे. तसेच अक्रोड, बदाम, काजू यांचे तुकडे खावेत. ऑलिव्ह तेलचा वापर करावा. कोशिंबीरमध्ये चीज, मांस, मासे यांचा वापर करावा. जेणेकरून कोलोस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवू शकता.
१. ओटचे पीठ - ओटमध्ये उच्च फायबर असते. त्यामुळे आहारात ओटचा वापर करावा. ओटमुळे वाईट कोलोस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. ओट पीठाचे मिश्रण करुन घ्यावे. सोबत सफरचंद, केळं खाल्लेतरी चालेल.
२. माशांच्या आहात वापर - आहारात मासे घेतल्याने निरोगी हृदय राहते. ओमेगा-३ फॅटी अॅसिडस् चे प्रमाण असते. त्यामुळे याचा फायदा हृदयाला मिळतो. माशाच्या तेलामुळे अकस्मात मृत्यूवर मात करता येते. कोलोस्ट्रॉल कमी करण्यासाठी आठवड्यातून दोनदा तरी मासे खाणे आवश्यक आहे. खाऱ्या, गोड्या पाण्यातील मासे खावेत. यातून ओमेगा-३ फॅटी अॅसिडस् अधिक मिळते.
३. अक्रोड, बदाम आणि काजू - अक्रोडचे तुकडे, बदाम आणि काजू रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करु शकते. अक्रोडाचे तुकडे देखील निरोगी रक्तवाहिन्या ठेवण्यास मदत करते. शेंगदाणे, पिस्ता यांचा आहारात वापर करावा.
४. ऑलिव्ह तेल - ऑलिव्ह तेलाचा वापर केला तर आपले "वाईट" (LDL) कोलेस्ट्रॉल कमी होते. तर आपले "चांगले" (HDL) कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. या तेलात फॅक्ट कमी असल्याने २ चमचे याचा (२३ ग्रॅम) आहारात वापर करावा. त्यामुळे हृदयही निरोगी राहते. ऑलिव्ह तेल भाजीत टाकावे. किंवा लोण्याचाही वापर करु शकता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.