तेजपानामुळं दात चमकदार होतात, जाणून घ्या फायदे!

तेजपान... भारतीय मसाल्यांचा एक महत्त्वाचा भाग. तेजपान जेवणात नुसती चव वाढवत नाही, तर आरोग्यही सांभाळतं. 

Updated: Apr 8, 2015, 12:51 PM IST
तेजपानामुळं दात चमकदार होतात, जाणून घ्या फायदे! title=

मुंबई: तेजपान... भारतीय मसाल्यांचा एक महत्त्वाचा भाग. तेजपान जेवणात नुसती चव वाढवत नाही, तर आरोग्यही सांभाळतं. 

जाणून घेऊया तेजपानचे फायदे-

# तेजपानाचे 2-3 पानं अर्धा कप पाणी किंवा चहामध्ये उकळवून पाणी पिल्यानं सर्दी आणि खोकल्यात आराम मिळतो. 
# मधूमेहाच्या रुग्णांनी तेजपानाच्या पावडरचं एक महिनाभर सेवन केल्यानं रक्तात ग्लुकोज आणि कोलेस्ट्रॉल पातळीत कमी येते.
# या पावडरनं आठवड्यातून दोन वेळा मंजन केल्यानं दातांची चमक आणि शूभ्रता कायम राहते.
# निद्रानाशाची समस्या असेल तर तेजपानाची थोडी पावडर पाण्यात घोळून रात्री झोपण्यापूर्वी घ्या. चांगली झोप येईल.
# तेजपानाची 1-2 पानं एक कप पाण्यात उकळून घ्या. पाणी आधी झालं की, थंड झाल्यानंतर पाणी प्या. त्यामुळं कोलेस्ट्रॉल पातळीत कमतरता होते. मात्र याचं सेवन करत असतांना तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
# पोटात इन्फेक्शन झालं असेल तर तेजपानाचा वापर भाजीत करावा.
# कफ झाला असेल तर दोन पानं कुटून चहा किंवा दूधात उकळून प्यायाल्यानं फायदा मिळेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.