लंडन : कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ही सर्वात मोठी खुशखबर ठरू शकते... लंडनमध्ये नुकतंच कॅन्सरग्रस्त रुग्णांचा ट्युमर रोखण्यासाठी एक लस बनवण्यात आलीय.
या लसीमुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांची प्रतिरोधक क्षमता वाढते आणि त्यामुळे शरीरात असलेला ट्यूमर नष्ट होऊ शकतो, असा दावा ही लस तयार करणाऱ्या वैज्ञानिकांनी केलाय.
या लसीचा पहिल्यांदा प्रयोग ९ फेब्रुवारी रोजी केली पॉटर या ३५ वर्षांच्या ब्रिटिश महिलेवर करण्यात आलाय. गेल्या वर्षी तपासणीत केलीला अॅडव्हॉन्स्ड सर्वाइकल कॅन्सर असल्याचं स्पष्ट झालं होतं. यानंतर आणखी ३० जणांवर पुढची दोन वर्ष या लसीचा प्रयोग केला जाणार आहे. सोबतच, रुग्णांवर केमोथेरेपीही सुरू राहील.
या लसीमध्ये एक खास पद्धतीचं प्रोटीन एन्जाईम आहे... जे कॅन्सर सेल्सला तोडत त्याला हळू - हळू नष्ट करतं... असा दावा वैज्ञानिकांनी केलाय.
या लसीकरणाचा प्रयोग यशस्वी झाला तर कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी हा खूप मोठा दिलासा असेल.