नवी दिल्ली : आतापर्यंत टूथपेस्टचा वापर केवळ दात घासण्यासाठी केला जात असे. मात्र तुम्हाला माहीत आहे का त्वचेच्या सौंदर्यासाठीही टूथपेस्टचा वापर करतातात.
टूथपेस्टचे असेही अनेक फायदे
टूथपेस्टमुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते.
त्वचेवर चमक आणण्यासाठी एक चमचा टूथपेस्टमध्ये थोडा लिंबाचा रस मिसळा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील डाग कमी होतात.
मुरुमांची समस्या असल्यास मुरुमे असलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावा. दुसऱ्या दिवशी मुरुमे सुकून जातील.
सुरकुत्याही टूथपेस्टच्या वापराने कमी होतात. यासाठी टूथपेस्ट सुरकुत्या असलेल्या ठिकाणी लावा. रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा धुवा. टूथपेस्टच्या मदतीने चेहऱ्यावरील काळे डागही कमी करता येतात. यासाठी टूथपेस्टमध्ये टोमॅटोचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा.
तुम्हाला ब्लॅकहेडची समस्या असेल तर अक्रोडच्या स्क्रबसोबत टूथपेस्ट मिसळून लावा.
चेहऱ्यावरील नको असलेले केस हटवण्यासाठी आता पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. यासाठी केवळ टूथपेस्टच्या मिश्रणात लिंबू अथवा साखर मिसळा. या पेस्टला चेहऱ्यावर लावून मसाज करा. काही दिवसांत तुम्हाला फरक जाणवेल.
तुमची त्वचा तेलकट असेल तर टूथपेस्टमध्ये पाणी आणि मीठ मिसळा. रोज सकाळी हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास तेलकट त्वचेपासून मुक्ती मिळेल.