नवी दिल्ली : थंडीचा महिना सुरु झाला की अनेकजण गरम पाण्याने आंघोळ करण्यास सुरुवात करतात. मात्र गरम पाण्याने आंघोळ केल्यास तुमची त्वचा अधिक शुष्क आणि कोरडी होऊ शकते. तसेच अधिक गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेसंबंधित आजारांचा धोकाही वाढतो.
थंडीच्या दिवसात थंड पाण्याने आंघोळ करणे शक्य होत नाही मात्र अधिक गरमही पाणी वापरु नये. अशावेळी कोमट पाण्याचा वापर करावा.यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कायम राहील.
थंडीच्या दिवसात त्वचा अधिक कोरडी होते. अनेकदा खाजेमुळे जखम होण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात ऑलिव्ह ऑईल अथवा नारळाच्या तेलाचे काही थेंब टाका.