www.zee24taas.com, झी मीडीया, मुंबई
तुम्हाला मधुमेहाचा त्रास आहे का? आता हा मधुमेह आयुर्वेदिक उपचाराने दूर करता येतो. तसे संशोधनही करण्यात आले आहे. आयुर्वेदिक संशोधनासाठी राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (एनबीआरआई) काम करीत आहे.
जगात मधुमेहाची एक समस्या झाली आहे. यामध्ये भारतही मागे नाही. मधुमेहावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मधुमेहावर संशोधन करण्यासाठी लखनऊमध्ये राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (एनबीआरआई) काम करीत आहे.
या संस्थेतील शास्त्रज्ञ मधुमेहवरील औषध बनवण्याचे काम करीत आहेत. हे औषध मधुमेह या रोगावर रामबाण उपाय ठरेल, अशी आशा आहे.
`एनबीआरएमएपी-डिबी` नावाच्या या औषधामुळे कोणत्याही प्रकारचे आपले नुकसान होणार नाही. मात्र, या औषधामुळे ग्लुकोजच्या मात्रावर नियंत्रण मिळविणे शक्य होते. मधुमेह होण्याच्या सुरुवातीलाच जर का हे औषध घेतले, तर इन्सुलिन घेण्याची गरज नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
एनबीआरएमएपी-डिबी औषध पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलं आहे. त्यामध्ये अनेक औषधी वनस्पतींचा वापर केला आहे. दिल्लीमधील विज्ञानभवनात हे औषध उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या उपस्थित लाँच करण्यात आले.
या औषधाचे पेटंटही घेण्यात आले आहे. हर्बल औषध बनवणाऱ्या कंपनींशी या औषधासंदर्भात बोलणी सुरु आहेत. त्यामुळे हे मधुमेहावरील औषध लवकरच बाजारात उपलब्ध होईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.