औषधांचा प्रभाव बॅक्टेरियांपुढे कमी पडतोय?

आजारातून लवकर उठण्यासाठी अनेक जण अॅन्टीबायोटिक्स औषधांचा वापर करतात. परंतु, आता अॅन्टीबायोटिक औषधांच्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेत. कारण, आजच्या जमान्यात अॅन्टीबायोटिक्स रेजिस्टन्स एक नवी समस्या म्हणून समोर येतेय.  

Updated: Oct 16, 2015, 04:08 PM IST
औषधांचा प्रभाव बॅक्टेरियांपुढे कमी पडतोय? title=

नवी दिल्ली : आजारातून लवकर उठण्यासाठी अनेक जण अॅन्टीबायोटिक्स औषधांचा वापर करतात. परंतु, आता अॅन्टीबायोटिक औषधांच्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेत. कारण, आजच्या जमान्यात अॅन्टीबायोटिक्स रेजिस्टन्स एक नवी समस्या म्हणून समोर येतेय.  
 
अॅन्टीबायोटिक रेजिस्टन्स म्हणजे अशी स्थिती जिथे एखादा बॅक्टेरिया अॅन्टीबायोटिक औषधांविरुद्ध प्रतिरोधक क्षमता निर्माण करतो. सध्या, औषधांपेक्षा आजार निर्माण करणारे बॅक्टेरिया जास्त कार्यक्षम होऊ लागलेत, असं आपण सहज म्हणून जातो... हिच स्थिती म्हणजे अॅन्टिबायोटिक्स रेजिस्टन्स 

एका शोधादरम्यान अॅन्टीबयोटिक रेजिस्टन्ट बॅक्टेरियांचा परिणाम काही वेगळा आणि मानवी शरीरात त्याची प्रतिक्रिया वेगळीच असल्याचं आढळून आलंय. 

'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या माहितीनुसार, असं यासाठी कारण जेव्हा एखादं अॅन्टीबायोटिक औषध घेतलं जातं तेव्हा या औषधांच्याविरुद्ध लढण्यासाठी प्रतिरोधक क्षमता निर्माण होण्याचा धोका कायम असतो. जेव्हा संक्रमण (इन्फेक्शन) होतं तेव्हा हा रेजिस्टन्ट बॅक्टेरिया धोका वाढवण्याचं काम करतो. यावर, अॅन्टीबायोटिक्सचा परिणाम शून्य असतो. 

रिपोर्टमध्ये अॅन्टीबायोटिक औषधांच्या परिणामांवर यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये मायक्रोबायोलॉजीचे प्रोफेसर एम.जे. महान यांनी शोधाचा दाखला दिलाय. अॅन्टिबायोटिक्स औषधांच्या परिणामांवर महान यांचा अहवाल ऑगस्ट महिन्यात जर्नल ई-बायोमेडिसीनमध्ये प्रकाशित झालाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.